मुंबई - शेअर बाजारातील दुस-या फळीतील समभागांची गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने शेअर बाजारात बुधवारी सलग तिस-या सत्रांत तेजी दिसून आली. त्यातच धातू, ऊर्जा आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तूंच्या समभागांच्या खरेदीने तेजीला बळ मिळाले. सेन्सेक्स 11.44 अंकांनी वाढून 25,561.16 या पातळीवर बंद झाला. हा सेन्सेक्सचा एक आठवड्याचा उच्चांक आहे. निफ्टीने 16.05 अंकांच्या कमाईसह 7640.45 हा पातळी गाठली.
दोन दिवसांच्या सलग तेजीनंतर गुरूवारी बाजार प्रारंभीच्या सत्रांत स्थिर असलेल्या बाजाराने नंतर मात्र सकारात्मक वाढ नोंदवली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 17 समभाग वधारले तर 13 समभाग घसरले. बाजारातील दुस-या फळीतील समभागांनी चांगली कमाई केली. किरकोळ गुंतवणूकदारांनी स्मॉल कॅप व मिड कॅप समभागांची जोगरदार खरेदी केली.