आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Divya Marathi

सेन्सेक्सचा दोन आठवड्यांचा उच्चांक, आयटीचे शेअर्स ऐटीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या समभागांतील जोरदार खरेदीने गुरुवारी शेअर बाजारात तेजी आली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीच्या तिमाहीतील चांगल्या कामगिरीवर खुश झालेल्या गुंतवणूकदारांनी आयटी समभागांची खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्स 80.40 अंकांच्या वाढीसह 25,641.56 वर पोहोचला. हा सेन्सेक्सचा दोन आठवड्यांचा उच्चांक आहे. निफ्टी 23.45 अंकांच्या कमाईसह 7663.90 वर स्थिरावला.

युक्रेन-रशियाच्या सीमेवर मलेशिया विमानावर क्षेपणास्त्र डागल्याच्या घटनेमुळे आशियातील प्रमुख शेअर बाजारांत घसरण दिसून आली. देशातील शेअर बाजारातही सकाळच्या सत्रात या घटनेचा परिणाम दिसून आला. नंतर मात्र आयटी समभागांच्या खेरदीने बाजारात तेजी आली. याशिवाय बँकिंग आणि भांडवली वस्तूंच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या त्यामुळे बाजारातील तेजीला बळ आले. टीसीएसने चांगली कामगिरी बजावल्याने आयटी कंपन्यांचे शेअर्स तेजीत आले. टीसीएसने 2.58 टक्के, विप्रो 1.83 टक्के आणि इन्फोसिसने 0.31 टक्के वाढ नोंदवली. दुस-या फळीतील समभागांनी आपले आकर्षण कायम ठेवले असून गुरुवारी किरकोळ गुंतवणूकदारांनी स्मॉल व मिड कॅप कंपन्यांच्या समभागांत मोठ्या प्रमाणात नफा वसुली केली.