आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Divya Marathi

शेअर बाजारात खरेदीचा जोर, सेन्सेक्स ४६ अंकांनी वाढला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक बाजारात घसरलेल्या कच्च्या तेलाच्या किमती, विदेशी निधी संस्थांकडून झालेली खरेदी आणि बँका, वाहनासारख्या समभागांना चांगली मागणी येऊन सेन्सेक्सने ४६ अंकांच्या वाढीची नोंद करीत पुन्हा एकदा कमाल पातळीवर तो बंद झाला.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक २६,३२२.६६ अंकांच्या भक्कम पातळीवर उघडून मधल्या सत्रात २६,४६४.८० अंकांच्या कमाल पातळीपर्यंत गेला. दिवसअखेर सेन्सेक्समध्ये ४५.८२ अंकांची वाढ होऊन तो २६,३६०.११ अंकांच्या पातळीवर बंद झाला. धातू, स्थावर मालमत्ता, आयटी आणि ऊर्जा समभागांना विक्रीचा फटका बसल्याने सेन्सेक्स नंतर २६,२६२.५२ अंकांच्या पातळीवर घसरला. निफ्टी निर्देशांक १५.८० अंकांनी घसरून ७८९१.१० वर बंद झाला.

नफ्यावर भर : नफारूपी कमाई करण्यावर गुंतवणूकदारांनी भर दिला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यामुळे बाजाराला चांगला डोस मिळाल्याचे मत बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ संशोधक विश्‍लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले.