आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Divya Marathi

सेन्सेक्स पुन्हा २७ हजारांखाली; २४४ अंकांनी डुबकी, निफ्टी ८१०० खाली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महागाईने पाच वर्षांचा नीचांक गाठून सर्वसामान्यांना दिलासा दिला. पण तो शेअर बाजाराच्या मात्र पदरात पडू शकला नाही. अमेिरकेतील व्याजदर वाढीची भीती आणि चीनची आैद्याेिगक वाढीची निरुत्साहजनक आकडेवारी या जागतिक पातळीवरील नकारात्मक घडामाेडींमुळे बाजारात विक्रीचा मारा झाला. त्याचा बड्या समभागांना फटका बसून सेन्सेक्सने गेल्या पाच आठवड्यांत पहिल्या एकाच िदवसात २४४ अंकांची डुबकी लावली.

डाॅलरच्या तुलनेत ६१.०५ रुपयांपर्यंत अवमूल्यन झालेल्या रुपयामुळेदेखील बाजाराचा मूड गेला. बाजारात झालेल्या विक्रीत प्रामुख्याने धातू, माहिती तंत्रज्ञान, तेल आणि वायू, भांडवली वस्तू, बँका, ग्राहकोपयाेगी वस्तू, वाहन, सार्वजनिक कंपन्या, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांना फटका बसून सेन्सेक्स २७ हजार अंकांच्या पातळीवरून खाली आला. सेन्सेक्स नकारात्मक पातळीवर उघडला. जागितक घडामाेडीमुळे ताे झटकन २७ हजार अंकांच्या खाली गेला. जुलै महनि्यात आैद्याेिगक उत्पादनाने गेल्या चार महनि्यांतील नीचांकी वाढ नाेंदवल्याचादेखील बाजारावर परणिाम झाला. िदवसअखेर सेन्सेक्स २४४.४८ अंकांनी घसरून २६,८१६.५६ अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीचा निर्देशांकदेखील ६३.५० अंकांनी घसरून ८१०० अंकांच्या खाली गेला.

रुपया एकसष्टीत
आयातदारांकडून डॉलरला आलेल्या मोठ्या मागणीमुळे सोमवारी रुपया दणकून आपटला. डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ४८ पैशांनी घसरून ६१.१३ झाले. रुपयाची ही पाच आठवड्यांतील सर्वांत मोठी घसरण आहे. ऑगस्टमधील आयात -निर्यातीतील तूट वाढल्याचा दबाव रुपयाच्या मूल्यावर आला.

टॉप लुझर्स - िहंदाल्को, टाटा स्टील, सेसा स्टरलाइट, ओएनजीसी, कोल इंडिया, एचडीएफसी.