आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोळसा वाटपाचा धक्क: शेअर बाजारात 'घट'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नैसर्गिक वायूंच्या किमतींचा लांबणीवर पडलेला फेरआढावा आणि कोळसा खाण वाटपाबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल या दोन्ही गोष्टींनी बाजाराला धक्का दिला. तेल आणि वायू समभागांबरोबरच धातू, ऊर्जा, बँक समभागांची तुफान विक्री झाल्याने सेन्सेक्स २७६ अंकांनी गडगडला. सलग तिस-या दिवशी घसरण कायम राहत सेन्सेक्सने एक महिन्यांचा नीचांक गाठला.

डेरिव्हेटिव्हज व्यवहारांची मुदत गुरुवारी संपल्यामुळे बाजारात गुंतवणूकदारांनी सावध करणे पसंत केले. डेरिव्हेटिव्हज व्यवहारांच्या अखेरच्या दिवशी मुंबई आणि राष्ट्रीय शेअर बाजारातील उलाढाल ७.२ लाख कोटींच्या वर गेली. दिवसअखेर सेन्सेक्स २७६.३३ अंकांनी घसरून २६,४६८.३६ अंकांवर बंद झाला. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने ७३० अंकांची गटांगळी खाल्ली आहे. निफ्टी ९०.५५ अंकांनी घसरून ७९११.८५ वर बंद झाला.