आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘विक्रमादित्य’; सेन्सेक्सचा नवा विक्रम; निफ्टी प्रथमच 7800 अंकांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गेल्या सलग आठ दिवसांपासून नवनव्या विक्रमांची नोंद करीत असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी आता ‘विक्रमादित्य’ झाले आहेत. कंपन्यांचा उत्साहवर्धक आर्थिक निकाल, विदेशी गुंतवणूकदारांकडून भांडवल बाजारात येत असलेल्या भरभरून निधीवर आरूढ होत सेन्सेक्सने 26,271.85 अंकांचे नवे शिखर गाठले, तर निफ्टी इतिहासात पहिल्यांदाच 7,8000 अंकांच्या जाऊन पोहोचला.

दुपारच्या सत्रापर्यंत सेन्सेक्स नकारात्मक पातळीत फिरत होता, परंतु नंतर मात्र खरेदी पाठिंबा मिळून कामकाजाच्या अखेरच्या सत्रात सेन्सेक्सने 124.52 अंकांची उसळी घेतली. दिवसभरात 26,292.66 अंकांची कमाल पातळी गाठल्यानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 26,271.85 अंकांच्या पातळीवर गेला. सप्टेंबर 2012 पासूनची सर्वाधिक चांगली कामगिरी करताना सेन्सेक्स गेल्या आठ दिवसांत 1,265 अंकांची झेप घेतली आहे. या वर्षात सेन्सेक्सने 24 अंकांची वाढ नोंदवली आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी 12 अब्ज डॉलरची समभाग खरेदी केली आहे. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 34.85 अंकांनी वाढून 7,800 च्या वर म्हणजे 7,830.60 अंकांच्या पातळीवर बंद झाला. निफ्टीमध्ये आतापर्यंत 376.45 अंकांची वाढ झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने विमा क्षेत्रातील 49 टक्के विदेशी थेट गुंंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यास परवानगी दिल्यामुळे या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांचा निधी येण्याचा मार्ग झाला आहे. त्याचबरोबर सरकारी रोख्यांमधील विदेशी गुंतवणूकदारांच्या गुंतवणूक मर्यादेत पाच अब्ज डॉलरने केलेली वाढ आणि रेल्वे व संरक्षण क्षेत्रातील एफडीआयचे नियम लवकरच शिथिल करण्याचे संकेत यामुळेदेखील बाजाराला मोठा आधार मिळाला.
एफआयआय फिदा
जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे देशातील शेअर बाजारांना भक्कम पाठबळ मिळाले. विदेशी गुंतवणूकदार संस्थादेखील बाजारात भरभरून गुंतवणूक करीत असल्याचाही बाजारावर चांगला परिणाम झाल्याचे व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेसचे संशोधनप्रमुख जिग्नेश चौधरी यांनी सांगितले. गेल्या तीन दिवसांत या गुंतवणूकदारांनी 1,225 कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली आहे.

टॉप गेनर्स : हिंदाल्को, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, विप्रो, आयटीसी, इन्फोसिस, सेसा स्टरलाइट

टॉप लुझर्स : गेल इंडिया, डॉ. रेड्डीज लॅब, हीरो मोटोकॉर्प धातू, आयटी समभागांवर उड्या : चीनच्या उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीचाही तेजीला लाभ झाला. धातू, माहिती तंत्रज्ञान, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी आली; परंतु ग्राहकोपयोगी वस्तू, औषध, ऊर्जा समभागांना विक्रीचा फटका बसला.