आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निफ्टीचा उच्चांक, तेजी परतली; सेन्सेक्स 76 अंकांनी वधारला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- लोकसभा निवडणूक निकालानंतर शेअर बाजारात चार दिवसांच्या तेजीनंतर बुधवारी बाजाराने थोडी उसंत घेतली होती. गुरुवारी शेअर बाजारात तेजी पुन्हा परतली. गुंतवणूकदारांनी केलेल्या खरेदीमुळे निफ्टी निर्देशांकाने 23.50 अंकांच्या कमाईसह 7275.50 ही उच्चांकी पातळी गाठली. सेन्सेक्स 76.38 अंकाच्या वाढीसह 24,374.40 वर स्थिरावला. तिकडे विदेशी मुद्रा विनियम बाजारात रुपयाने डॉलरची चांगली धुलाई करत 11 महिन्यांचा उच्चांक गाठला.

शेअर बाजारात ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू, रिअँल्टी आणि ऊर्जा कंपन्यांच्या समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या. जागतिक बाजारातील सकारात्मक संकेतांनी खरेदीचा उत्साह वाढवला. किरकोळ गुंतवणूकदारांनी मध्यम श्रेणीतील समभाग खरेदीचा सपाटा सुरूच ठेवल्याने शेअर बाजारातील तेजीला उधाण आले. बाजारातील लघु व मध्यम कंपन्यांचे समभाग चमकले. स्मॉल कॅप निर्देशांक 2.11 टक्क्यांनी तर मिड-कॅप निर्देशांक 2.31 टक्क्यांनी वधारला. भाजारातील 12 पैकी 10 क्षेत्रीय निर्देशांकात चांगली खरेदी दिसून आली.

आशियात चीनचा बाजार किरकोळ घसरणीसह बंद झाला. तेथील पीएमआय मॅन्युफॅक्चरिंगच्या आकडेवारीने पाच महिन्यांचा उच्चांक गाठला. आशियातील इतर प्रमुख बाजार मात्र वधारले. युरोपातील प्रमुख शेअर बाजारांत संमिर्श कल दिसून आला.

रुपयाचा 11 महिन्यांचा उच्चंक : रुपयाने गुरुवारी डॉलरची चांगली धुलाई केली. निर्यातदारांकडून चांगली मागणी आल्याचा फायदा रुपयाला झाला, डॉलरच्या तुलनेत रुपयाने 30 पैशांची कमाई करत 58.47 ही पातळी गाठली. रुपयाचा हा 11 महिन्यांतील उच्चंकी स्तर आहे.

सोनेरी मुलामा
देशातील शेअर बाजारात ब्ल्यू चिप कंपन्यांतील खरेदीवर गुंतवणूकदारांचा भर आहे. त्यातच ज्वेलरी कंपन्यांच्या समभागांनी वाढीची झळाळी दाखवल्याने तेजीला सोनेरी मुलामा मिळाला.
- जिग्नेश चौधरी, संशोधन प्रमुख, व्हेरासिटी ब्रोकिंग

तेजीचे मानकरी : एनटीपीसी, कोल इंडिया, मारुती सुझुकी, सेसास्टरलाइट, टाटा पॉवर, गेल इंडिया, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, टाटा स्टील, अँक्सिस बँक.

घसरलेले समभाग : हिंदाल्को, भेल, भारती एअरटेल, एचडीएफसी, विप्रो, हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स,