आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Nifty, Divya Marathi

किरकोळ वाढीसह निर्देशांकांचा उच्चांक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - स्थानिक तसेच जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे बाजारात तुफान खरेदी झाली. या खरेदीच्या झंझावातामध्ये सलग सहाव्या सत्रात निर्देशांकाने वाढ कायम ठेवली. इतकेच नाही तर सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही निर्देशांकांनी आपले अगोदरचे विक्रम मोडत पुन्हा नवी विक्रमी पातळी गाठली. निफ्टी तर मधल्या सत्रात 7,900 अंकांच्या पल्याड गेला.

सेन्सेक्स आणि निफ्टीने सलग दुस-या दिवशी नव्या विक्रमांची नोंद केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी 15 ऑगस्टला पायाभूत आणि उत्पादन क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ठोस पावले उचलण्याच्या घोषणेमुळे बाजारात उत्साहाचे वारे वाहत आहेत. सेन्सेक्स भक्कम पातळीवर उघडला आणि खरेदीच्या पाठबळावर 29.71 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स दिवसअखेर 26,240.67 अंकांच्या आणखी एका नव्या पातळीवर बंद झाला. निफ्टीने पहिल्यांदाच 7900 अंकांचा महत्त्वाचा टप्पा ओलांडला. निफ्टी दिवसअखेर 23.25 अंकांनी वाढून 7897.50 वर बंद झाला.

टॉप गेनर्स : महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, भेल, बजाज ऑटो, डॉ. रेड्डीज लॅब, मारुती सुझुकी, सेसा स्टरलाइट, कोल इंडिया, हीरो मोटोकॉर्प

तेजीला उधाण : कंपन्यांचे उत्साहजनक तिमाही निकाल, हलका झालेला भौगोलिक राजकीय तणाव. भांडवल बाजारात सातत्याने येत असलेला निधीचा ओघ, सार्वजनिक कंपन्या आणि आरोग्य कंपन्यांच्या समभागांना आलेली मागणी, जागतिक बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींनी गाठलेला 14 महिन्यांचा नीचांक आणि अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलली जाण्याची आशा या सगळ्या गोष्टींमुळे बाजारात सध्या तेजीची भावना आहे.