आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market News In Marathi, Sensex, Wall Street, Divya Marathi

सेन्सेक्सची किरकोळ कमाई, विक्रीच्या मा-याचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आशिया आणि वॉलस्ट्रीट शेअर बाजारातील तेजीच्या बळावर सकाळच्या सत्रात 130 अंकांची सेन्सेक्सने उसळी घेतली. पण ती फार काळ तग धरू शकली नाही. दुपारच्या सत्रानंतर झालेल्या विक्रीच्या मा-यास सकाळच्या सत्रातील कमाई धुऊन निघून सेन्सेक्समध्ये केवळ 14 अंकांची वाढ झाली.


येत्या गुरुवारी मार्च महिन्यातील डेरिव्हेटिव्ह व्यवहारांची मुदत संपत असल्याने गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेत नफारूपी विक्री करण्यावर जास्त भर दिला. त्यातल्या त्यात टाटा मोटर्स, अ‍ॅक्सिस बॅँक, टाटा स्टील, विप्रो, टीसीएस, आयटीसी, हिंदाल्कोमुळे सेन्सेक्स चांगल्या पातळीत राहण्यास मदत झाली. आशियाई शेअर बाजारातील तेजीच्या बळावर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक कमाल पातळीवरच उघडला. अमेरिकेच्या सकारात्मक आर्थिक आकडेवारीमुळे वॉलस्ट्रीट शेअर बाजारातील तेजीमुळे सेन्सेक्सने 21,870.11 अंकांची कमाल पातळी गाठली. दिवसअखेर 21,753.75 अंकांच्या पातळीवर बंद होताना थोडीफार नरमाई आल्याने सेन्सेक्समध्ये केवळ 13.66 अंकांची वाढ झाली. सेन्सेक्स गुरुवारी 92.77 अंकांनी घसरला होता. राष्‍ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 10.10 अंकांनी वाढून 6493.20 अंकांच्या पातळीवर बंद झाला. विशेष म्हणजे सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ झालेली असली तरी बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक सकारात्मक पातळीवर बंद झाले. केवळ तेल आणि वायू, हेल्थकेअर निर्देशांकाची पडझड झाली.


रिझर्व्ह बॅँकेचे जाहीर होणारे नाणेनिधी धोरण आणि एप्रिलमधील लोकसभा निवडणुका लक्षात घेता बाजारात चढ-उतार राहण्याची शक्यता. त्यातून जागतिक घडामोडी आणि चौथ्या तिमाहीतील आर्थिक निकाल लक्षात घेता त्याचाही बाजारावर परिणाम होण्याची शक्यता बोनान्झा पोर्टफोलिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी व्यक्त केली.