आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयटीसीमुळे शेअर बाजारात घसरणीचा धूर, सेन्सेक्स 74 अंकांनी खाली; सिगारेट महागणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इराकमधील हिंसाचार आणि त्यापाठोपाठ कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीनंतर बाजारात अतिशय सावध व्यवहार केले जात आहेत. त्यातच आता सिगारेटवरील अबकारी शुल्कात वाढ होण्याच्या भीतीतून आयटीसीच्या समभागांची तुफान विक्री झाली. परिणाम सेन्सेक्स 74 अंकांनी घसरून सलग तिसर्‍या आठवड्यात 25,031.32 अंकांच्या खालच्या पातळीवर बंद झाला.

वाढलेली महागाई, लांबणीवर पडलेला पाऊस आणि रेल्वे मालवाहतूक भाड्यातील वाढ या सगळ्या सकारात्मक घडामोडींमुळे सलग चौथ्या सत्रात सेन्सेक्सची घसरण झाली आहे. सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवशी सेन्सेक्स स्थिर पातळीवर उघडला आणि त्याने 25,197.50 अंकांची कमाल पातळी गाठली. पण ती फार काळ राहू शकली नाही. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स 25 हजार अंकांच्या खाली गडगडत 24,878.66 अंकांच्या पातळीवर गेला. दिवसअखेर सेन्सेक्स 74.19 अंकांनी घसरून 25,031.32 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार सत्रात सेन्सेक्स 489 अंकांनी गडगडला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 18.10 अंकांनी घसरून 7493.35 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्यातही आयटीसीमुळे सेन्सेक्सला सर्वात मोठा फटका बसला आणि या एकट्या समभागामुळे सेन्सेक्स 135.44 अंकांनी खाली आला होता. साखर कारखान्यांना अतिरिक्त 4,400 कोटी रुपये व्याजमुक्त कर्ज तसेच आयात शुल्कात वाढ करण्याच्या निर्णयामुळे साखर कंपन्यांच्या समभागांनी गुंतवणूकदारांचे तोंड गोड केले. त्यामुळे अखेरच्या सत्रात सेन्सेक्समध्ये थोडीफार सुधारणा होण्यास मदत झाली.

टॉप लुझर्स : आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो
टॉप गेनर्स : ओएनजीसी, हीरो मोटोकॉर्प, भेल, सेसा स्टरलाइट, महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, टाटा स्टील, आयसीआयसीआय बॅँक, हिंदाल्को, बजाज ऑटो, अ‍ॅक्सिस बॅँक.