आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयासह शेअर बाजारात तेजी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारल्याने शेअर बाजारात उत्साह आला. त्यातून निवडक समभागांच्या खरेदीवर गुंतवणूकदारांनी भर दिल्याने सेन्सेक्स, निफ्टी वधारले. सेन्सेक्सने 37.61 अंकांच्या वाढीसह 19,893.85 हा पातळी गाठली. निफ्टी 8.4 अंक वाढ नोंदवत 5,882.25 वर स्थिरावला.


आयटीसी, एचडीएफसी आणि सन फार्मा या समभागांच्या खरेदीमुळे सेन्सेक्सच्या वाढीला बळ मिळाले, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, टीसीएस, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि ओएनजीसी या दिग्गज समभागांना मात्र विक्रीचा फटका बसला. आरोग्य, ऊर्जा आणि भांडवली वस्तू निर्देशांक वधारले तर तेल आणि वायू, ग्राहकोपयोगी वस्तू आणि रिअ‍ॅल्टी निर्देशांक गडगडले. बँकिंग व्यवस्थेत पुरेसे खेळते भांडवल राखण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यात येतील असे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्यानंतर बाजाराचा मूड बदलला. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 14 समभाग वधारले. आशियातील प्रमुख शेअर बाजारात संमिश्र कल दिसून आला. चीन, हाँगकाँग आणि तैवानचे बाजार घसरणीसह तर जपान आणि दक्षिण कोरियाचे बाजार तेजीसह बंद झाले. युरोपातील प्रमुख बाजारात सत्राच्या प्रारंभी घसरण दिसून आली.


रुपया आठवड्याच्या उच्चांकावर
० डॉलरच्या तुलनेत गुरुवारी रुपयाने 37 पैशांची कमाई करत 62.07 ही पातळी गाठली. रुपयाचा हा आठवड्याचा उच्चंक आहे. रिझर्व्ह बँकेने डॉलरच्या खेरदीसाठी स्वॅप सुविधा सुरू केली होती. तिचे नियम शिथील केल्याचे पडसाद विदेशी विनियम बाजारात दिसून आले.
० इंडिया फॉरेक्सचे सीईओ अभिषेक गोयंका यांनी सांगितले, आशियातील बहुतेक देशांचे चलन चांगली कामगिरी करत आहेत. त्याचा लाभ रुपयाला होत आहे.


टॉप गेनर्स : भेल, टाटा स्टील, कोल इंडिया, सन फार्मा, डॉ. रेड्डीज लॅब
टॉप लुझर्स : जिंदाल स्टील, गेल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, सेसा गोवा, रिलायन्स इंडस्ट्रीज