आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफेखोरीने तेजीला लगाम , सेन्सेक्स 21 अंकांनी वधारला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवसभरातील सत्रात सेन्सेक्सने मिळवलेल्या तेजीला शेवटच्या सत्रातील नफेखोरीने लगाम बसला. आयटीसी आणि ओएनजीसी या दिग्गज समभागातील विक्रीने तेजीचा नूर पलटला. सेन्सेक्स 21.31 अंकांच्या वाढीसह 21,101.03 वर स्थिरावला, तर निफ्टीने 10.25 अंकांच्या कमाईसह 6284.50 ही पातळी गाठली. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिस व टीसीएस यांना नफेखोरीचा फटका बसला.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेमुळे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अमेरिका हीच जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आशियातील बाजारात तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजारातील 13 क्षेत्रीय निर्देशांकांपैकी 12 निर्देशांक वधारले. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बाजारातून खरेदी सुरूच ठेवली आहे. शुक्रवारी या संस्थांनी बाजारातून 990.19 कोटी रुपयांची खरेदी केल्याचे सेबीच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले.
बाजारातील नफेखोरीचा सर्वाधिक फटका इन्फोसिसला बसला. इन्फोसिसचे समभाग 2.35 टक्के घसरणीसह कोसळले. महागाई हाच व्याजदरातील प्रमुख अडथळा असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. राजन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. त्यामुळे व्याजदराशी निगडित समभागांची विक्री झाली. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 21 समभाग वधारले.
तेजीचे मानकरी
हिंदाल्को इंडस्ट्रीज, भेल, हीरो मोटोकॉर्प, ओएनजीसी, टाटा स्टील
घसरलेले समभाग
इन्फोसिस, टाटा पॉवर, एचडीएफसी, टीसीएस
अस्थिर वातावरण
भारतीय बाजारात सप्ताहाच्या प्रारंभीच्या सत्रात अस्थैर्य दिसून आले. रुपयातील तेजीमुळे बाजारातील तेजीला बळ मिळाले. त्यामुळे निर्देशांक ग्रीन झोनमध्ये स्थिरावले.
जिग्नेश चौधरी, रिसर्च हेड, व्हेरासिटी ब्रोकिंग सर्व्हिसेस.