आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफेखोरीने बाजारात घसरण; सेन्सेक्स 110 अंकांनी घसरला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- महागाई आणि औद्योगिक उत्पादन कामगिरीची आकडेवारी जाहीर होण्याअगोदर सावध पवित्रा घेत गुंतवणूकदारांनी केलेल्या नफारूपी विक्रीत सेन्सेक्स आणि निफ्टी गडगडले. सेन्सेक्सने 25 हजारी शिखराच्या पुढे जात नवीन विक्रम करूनही तो विक्रीच्या मार्‍यात फार काळ तग धरू शकला नाही.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात भक्कम पातळीवर उघडला. त्यानंतर त्यात आणखी सुधारणा होऊन तो मधल्या सत्रात 25,735.87 अंकांच्या नव्या शिखरावर जाऊन पोहोचला होता. परंतु तो फार काळ ही पातळी कायम राखू शकला नाही. गेल्या चार दिवसांपासून बाजारात आलेल्या तेजीवर नफारूपी विक्रीचे विरजण पडून सेन्सेक्स 25,365.65 अंकाच्या नीचांकी पातळीवर आला. दिवसअखेर सेन्सेक्स 109.80 अंकांनी घसरून 25,473.89 अंकांच्या पातळीवर बंद झाला. गेल्या चार सत्रांत सेन्सेक्सने 777.86 अंकांची मोठी वाढ नोंदवलेली होती. बाजारात निर्माण झालेल्या तांत्रिक दोषाचाही परिणाम झाला. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकाने पहिल्यांदाच 7,700 अंकांची नवी पातळी ओलांडली. निफ्टी 7,700.05 अंकांच्या पातळीवर गेला होता. अखेर 29.55 अंकांच्या घटीसह निफ्टी 7,626.85 वर बंद झाला.