आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारातील तेजीचा गोडवा हरपला सेन्सेक्स:239 अंकांनी आपटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जागतिक बाजारपेठेतील नरमाई, मध्यावधी निवडणुका अगोदरच होण्याची भीती आणि कंपन्यांच्या आर्थिक प्रगतिपुस्तकातील निकालाची लागलेली चिंता यामुळे बाजारात कामकाजाच्या अखेरच्या एक तासात झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 239 अंकांनी आपटून 18,801.64 अंकांच्या एका महिन्याच्या नीचांकी पातळीवर बंद झाला. सेन्सेक्स सकाळच्या सत्रात 19,034.00 अंकांच्या खालच्याच पातळीवर उघडला. वाहन समभागांच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स गडगडत खाली गेला. गेल्या चार सत्रांतील 359.53 अंकांची कमाई धुऊन निघाली व विक्रीच्या तडाख्यात सेन्सेक्स 239.31 अंकांनी घसरला. निफ्टीदेखील 75.20 अंकांनी घसरून 5672.90 अंकांच्या पातळीवर बंद झाला. आजच्या विक्रीच्या दणक्याने गुंतवणूकदारांची मालमत्ता घसरून 66 हजार कोटी रुपयांवर आली.
चौथ्या तिमाहीत कंपन्यांना तिमाही नफा कमी झाल्याच्या वृत्तामुळे बाजाराला कोणतीही सकारात्मक दिशा मिळाली नसल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले. कोटक सिक्युरिटीजच्या प्रायव्हेट क्लायंट ग्रुप रिसर्चचे उपाध्यक्ष संजीव झरबडे यांच्या मते मध्यावधी निवडणुका लवकर होण्याची भीती बाजाराला वाटत असून तेही या पडझडीचे एक मुख्य कारण ठरले.

टॉप लुझर्स
भारती एअरटेल, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, लार्सन अँड टुब्रो, स्टरलाइट इंडस्ट्रीज, हिंदाल्को, गेल इंडिया, हीरो मोटोकॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोल इंडिया, ओएनजीसी, जिंदाल स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, हिंदुस्तान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, टीसीएस, भेल