आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयामुळे सेन्सेक्सचे वांधे, निफ्टी 5600 या महत्त्वाच्या पातळीखाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने त्याचे पडसाद शेअर बाजारात उमटले. बुधवारी सकाळच्या सत्रात चांगली सुरुवात करणाºया बाजाराने दिवसअखेर नकारात्मक पातळी गाठली. सेन्सेक्स 77.03 अंकाच्या घसरणीसह 18552.12 वर बंद झाला. निफ्टीने 20.40 अंक गमावत 5588.70 पातळी गाठली. निफ्टी 5600 या महत्त्वाच्या पातळीखाली आला.
सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 18 समभाग घसरले. भारती एअरटेलला दंड ठोठावल्याने त्याचे समभाग 5.74 टक्क्यांनी आपटले. महिंद्रा अँड महिंद्राच्या समभागात 4.63 टक्के घसरण झाली. रुपयाच्या घसरणीचा फायदा सॉफ्टवेअर निर्यातदार कंपन्यांना झाला. टीसीएस, विप्रो, इन्फोसिसचे समभाग तेजीने चमकले.
आशियातील हाँगकाँग, सिंगापूर, दक्षिण कोरिया आणि तैवानचे बाजार तेजीसह बंद झाले. चीन आणि जपानच्या बाजारात घसरण दिसून आली. युरोपातील प्रमुख बाजारात तेजीचा कल होता.