आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सी-सॉचा खेळ, सेन्सेक्स घसरला; आज बाजाराला सुटी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डेरिव्हेटिव्हज सौदापूर्तीमुळे गुंतवणूकदारांनी घेतलेल्या सावध पवित्र्यामुळे शेअर बाजारात मंगळवारी चढ-उताराचा सी-सॉ खेळ रंगला. अखेर घसरणीचे पारडे जड झाले. नफेखोरीमुळे सेन्सेक्स 68.32 अंकांनी घसरून 21,032.71 वर बंद झाला. निफ्टी 16.10 अंकांनी घटून 6268.40 वर स्थिरावला. मागील दोन सत्रांत सेन्सेक्समध्ये 392.41 अंकांची घसरण झाली आहे.
सेन्सेक्सच्या यादीतील एचडीएफसी बँक, एचडीएफसी, सन फार्मा, सेसा स्टरलाइट आणि विप्रो हे समभाग घसरले. गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीचा सर्वाधिक फटका टाट पॉवरला बसला. टाटा पॉवरचा समभाग 3.2 टक्क्यांनी घसरला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी सोमवारी बाजारातून 135.42 कोटी रुपयांचा निधी काढून घेतला. तैवानचा अपवाद वगळता आशियातील प्रमुख बाजारात तेजी दिसून आली. युरोपातील प्रमुख बाजारात प्रारंभीच्या सत्रात सकारात्मक वातावरण होते. सेन्सेक्सच्या यादीतील 30 पैकी 19 समभाग घडगडले, तर 11 समभाग वधारले.
आज बाजाराला सुटी : नाताळनिमित्त मुंबई शेअर बाजार तसेच राष्ट्र्रीय श्ेअर बाजाराला सुटी असल्याने व्यवहार बंद राहतील.
रुपया 16 पैशांनी वधारला : डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी वाढून 61.79 झाला. रुपयाचा हा आठवड्याचा उच्चांक आहे.
घसरलेले समभाग : टाटा पॉवर, सेसा स्टरलाइट, विप्रो, सन फार्मा, हीरो मोटोकॉर्प, सिप्ला, एचडीएफसी, हिंदाल्को, एचडीएफसी बँक, गेल, टाटा स्टील