आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफेखोरीमुळे सेन्सेक्सची 265 अंकांनी घसरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- गेल्या पाच दिवसांत अनुभवलेल्या तेजीनंतर मंगळवारी सेन्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. नफेखोरीमुळे सेन्सेक्स 265 अंकांनी घसरून 20,974.79 वर स्थिरावला. तसेच निफ्टी 64.20 अंकांनी घसरून 6253.15 वर स्थिरावला.

सलग पाच दिवस वधारत सेन्सेक्स दिवाळीच्या मुहूर्तावर 21,239.36 अंकांवर बंद झाला होता. त्यात 1.25 टक्क्यांनी घसरण होऊन मंगळवारी तो 265 अंकांनी घसरला. सप्टेंबरनंतरची सेन्सेक्सची ही सर्वात मोठी घसरण आहे. 30 सप्टेंबर रोजी निर्देशांक 347.50 अंकांनी घसरला होता. निर्देशांकातील 30 पैकी 22 कंपन्यांची घसरण झाली. त्यात सर्वाधिक तोटा आयटीसी, आयसीआयसीआय बँक आणि एसटीसीला झाला. त्यांची 22 ते 30 अंकांनी घसरण पाहायला मिळाली. एफएमसीजी, आरोग्य सेवा आणि आयटी क्षेत्रात प्रामुख्याने घसरण झाली. गेल्या पाच दिवसांमध्ये सेन्सेक्स 669.08 अंकांनी वधारला होता. आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणामुळे सलग चौथ्या महिन्यात सेवाक्षेत्रामध्ये आकुंचन पाहायला मिळाले. सेवा उद्योगांमध्ये एसएसबीसी मार्केट पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स 44.6 (सप्टेंबर) वरून आॅक्टोबरमध्ये 47.1 आला. चालू आर्थिक वर्षात वित्तीय तूट 60 अब्ज डॉलरपेक्षा कमी राहणार असल्याचा विश्वास अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मंगळवारी व्यक्त केला. ही तूट 70 अब्ज डॉलरपर्यंत राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता.

जागतिक बाजाराचे परिणाम
जागतिक बाजारामध्येही गुंतवणूकदार सावधानता बाळगून व्यवहार करत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. इतर आशियाई बाजारांमध्ये असलेली घसरण आणि युरोपीय बाजार कमी अंकांवर सुरू झाल्याचा परिणामही स्थानिक बाजारावर झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

यांची घसरण : आयटीसी (3.52), आयसीआयसीआय बँक (3.07), सन फार्मा (2.96 टक्के), डॉ. रेड्डीज लॅब. (2.88), टीसीएस (2.74)
हे राहिले तेजीत : हिंदाल्को (1.47), कोल इंडिया (1.42), टाटा मोटार्स (1.02) (सर्व टक्क्यांमध्ये)

अजूनही सोन्यावर विश्वास
गेल्या आठवड्यात शेअर बाजारात चांगले चित्र पाहायला मिळाले. त्यानंतर सोन्याच्या दरामध्ये घसरण दिसून आली. तज्ज्ञांच्या मते मोठ्या कालावधीसाठी गुंतवणूक करणारे अजूनही सोन्यावर विश्वास दाखवत आहेत. 12 वर्षांतील आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, सोन्यात गुंतवणूक करणाºयाना चांगला परतावा मिळतो. आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या सीआयओ केनेथ अँड्रे यांच्या मते महागाईनंतरही सोन्याला चांगला परतावा मिळ ू शकतो.

सोन्यात घसरण
सोन्याच्या दरामध्ये मंगळवारीही घसरण पाहायला मिळाली. नवी दिल्ली येथे सोने 200 रुपयांनी घसरून 31,100 रुपयांवर आले. गेल्या सात दिवसांपासून घसरण सुरूच आहे. तसेच चांदीमध्येही 500 रुपयांची घसरण पाहायला मिळाली. चांदीचा दर प्रतिकिलो 48,500 रुपये होता.