आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market Sensex Growth 29 Points, Divyamarathi

सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ; डॉलरच्या तुलनेत रुपयाला बळकटी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबई शेअर बाजार सेन्सेक्सचा निर्देशांक मंगळवारी 29 अंकाच्या वाढीसह 20363.37 अंकांवर बंद झाला. आयटी आणि वाहन कंपन्यांच्या समभागांच्या विक्रीमुळे बाजारात काहीसे तेजीचे वातावरण तयार झाले. त्यामुळे या वाढीची नोंद होऊ शकली.

सकाळच्या सत्रात सेन्सेक्सला चांगली बळकटी मिळाली होती. पण दिल्ली सरकारने मुकेश अंबानी यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर रिलायन्सच्या समभागात आलेल्या घसरणीमुळे सेन्सेक्स केवळ 29 अंकाची वाढ नोंदवून बंद झाला.

दरम्यान, राष्ट्रीय शेअर निर्देशांक निफ्टीही 9.25 अंकाच्या वाढीसह 6062.70 अंकांवर बंद झाला. शेअर बाजाराप्रमाणेच रुपयालाही आज डॉलरच्या तुलनेत काहीशी बळकटी मिळाली. कालच्या 62.43 वरून रुपया डॉलरच्या तुलनेत 62.26 वर पोहोचला.