आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्समुळे सेन्सेक्सला बळ; तीन सत्रांनंतर तेजी...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- रिलायन्स इंडस्ट्रीज, ओएनजीसी आणि एचडीएफसी बँक या दिग्गज समभागांची जोरदार खरेदी झाल्याने तीन सत्रांनंतर बुधवारी बाजारात तेजी परतली. जगातील प्रमुख शेअर बाजारातील नकारात्मक कलाकडे दुर्लक्ष करत गुंतवणूकदारांनी खरेदी केली. यामुळे सेन्सेक्स 22.44 अंकांनी वाढून 19,568.22 वर बंद झाला. निफ्टी 4.40 अंकांच्या किरकोळ वाढीसह 5,923.85 वर स्थिरावला. एचएसबीसीच्या सर्व्हेनेही बाजारावर चांगला परिणाम झाला. भारतीय सेवा क्षेत्राची चांगली वाढ झाल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त करण्यात आला.

अमेरिकेचे आर्थिक प्रोत्साहन पॅकेज बंद होण्याच्या धारणेने युरोपातील एफटीएसई (इंग्लंड), कॅक (फ्रान्स) आणि डॅक्स (जर्मनी ) या निर्देशांकात घसरण दिसून आली. जपानचे पंतप्रधान शिन्जो अ‍ॅबे यांच्या भाषणाने गुंतवणूकदारांची निराशा झाली. त्यामुळे जपानचा निक्की निर्देशांक 4 टक्क्यांनी घसरला. आशियातील इतर प्रमुख शेअर बाजारात संमिश्र कल होता.