आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स पुन्हा 26 हजारांवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कंपन्यांच्या पहिल्या तिमाहीतील आर्थिक निकालांमुळे विदेशी गुंतवणूकदारांनाही प्रोत्साहन मिळाले आहे. या गुंतवणूकदारांनी केलेल्या काही निवडक बड्या समभाग खरेदीचे पाठबळ मिळून सेन्सेक्स 311 अंकांनी वाढून पुन्हा एकदा 26 हजारांच्या उच्चांकी पातळीवर गेला. सलग सहाव्या सत्रात सेन्सेक्सने चढती कमान कायम ठेवली आहे.

मुंबई शेअर बाजाराच्या इतिहासात सेन्सेक्सने दुसर्‍यांदा 26 हजारांचे शिखर सर केले आहे. या अगोदर सेन्सेक्स सात जुलैला या पातळीच्या वर म्हणजे 26,100.08 अंकांवर बंद झाला होता. मंगळवारी सेन्सेक्स 310.63 अंकांनी वाढून 26,025.80 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक गेल्या सहा सत्रांत 1,018 अंकांनी वर गेला आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 83.65 अंकांनी वाढून दिवसअखेर 7,767.85 अंकांच्या पातळीवर बंद झाला. मधल्या सत्रात निफ्टीनेदेखील 7,773.85 अंकांची कमाल पातळी गाठली होती.
भांडवल बाजारात सातत्याने निधीचा ओघ येत असल्याने गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास दुणावला आहे. जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरण, मान्सूनची प्रगती, आर्थिक सुधारणांचे संकेत याचाही बाजारावर सकारात्मक परिणाम झाला असल्याचे मत बाजारातील तज्ज्ञांनी व्यक्त केले.