आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्स 145 अंकांनी गडगडला, नऊ सत्रांनंतर बाजारात पडझड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आठवडाभर बाजारात आलेली तेजी कॅश करण्यासाठी गुंतवणूकदारांनी काही ठराविक बड्या समभागांची नफारूपी विक्री केल्यामुळे सेन्सेक्स 145 अंकांनी घसरून 26,126 अंकांच्या पातळीवर बंद झाला. जवळपास नऊ सत्रांनंतर सेन्सेक्स पहिल्यांदाच घसरला.

गेल्या दोन दिवसांमध्ये मोठ्या विक्रमांची नोंद करणार्‍या सेन्सेक्सने गेल्या आठ दिवसांत 1,265 अंकांची कमाई केली. सकाळच्या सत्रात तर सेन्सेक्सने 26,300.17 अंकांची नवी उंची गाठली होती. परंतु ही तेजी फार काळ राहिली नाही विदेशी गुंतवणूकदार संस्था आणि स्थानिक निधी संस्थांनी अलीकडे बाजारात चांगली कामगिरी केलेल्या समभागांना लक्ष्य केले. नफारूपी विक्रीच्या मार्‍यात सेन्सेक्स 145.10 अंकांनी घसरून 26,126.75 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
मधल्या सत्रात सेन्सेक्स 26,292.66 अंकांच्या पातळीवर गेला होता. निफ्टी सकाळच्या सत्रात 7840.95 अंकांच्या कमाल पातळीवर गेला होता. निफ्टी दिवसअखेर 40.15 अंकांनी घसरून 7790.45 अंकांच्या पातळीवर बंद झाला.