आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेन्सेक्सच्या रॉकेटची गगन भरारी, सर्व विक्रम मोडीत काढत 22,000 जवळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गुरुवारी शेअर बाजारात असलेली तेजी धनत्रयोजदशीलाही पाहायला मिळाली. आज (शुक्रवार) शेअर बाजाराने तेजीचे उड्डाण केले आहे. सेन्सेक्सने मोठी उंची गाढली आहे तर निफ्टीने गेल्या तीन वर्षातील सर्वोच्च पातळी गाठली आहे. शुक्रवारी बाजार सुरु झाला तेव्हाच सेन्सेक्स 21,293 अंकावर पोहोचला. निफ्टी 6330 अंकावर गेला. सेन्सेक्सने मागील पाच वर्षे 10 मिहिन्यातील विक्रमी उंची गाठली आहे. याआधी जानेवारी 2008 मद्ये 21,206 अंकावर गेला होता. बाजारातील या तेजीमुळे गुतंवणूकदार मात्र आनंदी नाहीत. कारण छोटे आणि मध्यम उद्योगांचे शेअर अजूनही खालीच आहेत.
गुरुवारीही सेन्सेक्सने विक्रमी टप्पा गाठला होता मात्र 2008 चा विक्रम याला तोडता आला नाही. गुरुवारच्या सत्राअखेर बाजारात नोंदणी असलेल्या सर्व कंपन्यांचे एकूण संचयित मूल्य 68,44,774 कोटी रुपये आहे. बुधवारच्या सत्रापेक्षा त्यात 64,000 कोटी रुपयांची भर पडली आहे. ही पातळी देशाच्या आतापर्यंतच्या गुंतवणूकदारांच्या विक्रमी संपत्ती पातळीपेक्षा खूपच कमी आहे. तीन वर्षांपूर्वी पाच नोव्हेंबर 2010 रोजी गुंतवणूकदारांची संपत्ती 77,28,600 कोटी रुपये या विक्रमी पातळीवर नोंदवण्यात आली. असे असले तरी पाच नोव्हेंबरला सेन्सेक्स 21,004.99 या पातळीवर होता. सध्या सेन्सेक्स या पातळीपेक्षा 200 अंकांहून अधिक पातळीवर आहे. सेन्सेक्सच्या कमाईच्या बाबतीत मात्र यंदाचा ऑक्टोबर फलदायी ठरला आहे.ऑक्टोबरमध्ये सेन्सेक्सने 9.20 टक्के अर्थात 1784.75 अंकांची वाढ नोंदवली. जानेवारी 2012 नंतर सेन्सेक्सची ही एका महिन्यातील सर्वाेत्तम कामगिरी आहे. सेन्सेक्सच्या यादीतील 30 ब्ल्यू चिप कंपन्यांपैकी 21 कंपन्यांचे समभाग वधारले. बाजारातील 13 क्षेत्रीय निर्देशाकांपैकी हेल्थकेअर वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकांनी चांगली कामगिरी नोंदवली. गुरुवारी मुंबई शेअर बाजारातील 89 समभागांनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.