आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात चढ-उतार राहण्याची शक्यता

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठवड्यात शेअर बाजारात अपेक्षेनुसार घसरण दिसून आली. देशातील आर्थिक पातळीवरील शांत वातावरण आणि नव्या संकेतांचा अभाव ही त्यामागची प्रमुख कारणे आहेत. मेमधील तेजीनंतर आलेल्या थकव्यातून बाजार बाहेर येत असल्याचे संकेत मिळत आहेत.

देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) निराशाजनक आकडेवारीमुळे बाजारात मोठी घसरण झाली. जानेवारी ते मार्च तिमाहीत जीडीपी एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 4.8 टक्के राहिला. यामुळे रिझर्व्ह बँकेच्या कर कपातीच्या शक्यतेवर पाणी पडले आहे. आरबीआयचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनी किरकोळ महागाई दराबाबत चिंता व्यक्त केली. चालू खात्यातील वाढत्या तुटीबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केल्याने बाजार प्रभावित झाला. वाहन विक्रीचे आकडे पुन्हा एकदा घसरलेले राहिले. चार तिमाहीनंतर एचएसबीसी मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय घटण्याचे संकेत मिळाले आहेत. यामुळेही भारतीय अर्थव्यवस्थेवरील विश्वासाबाबत चिंतेत भर टाकली. अशा परिस्थितीत वित्तीय तुटीचे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले आल्याने आशा पल्लवित झाल्या. जागतिक पटलावर अमेरिकेला आर्थिक प्रोत्साहन पॅकेज सुरूच राहण्यामुळे चिंतेत भर पडली आहे. विश्लेषकांच्या मते, फेडरल रिझर्व्ह आपली बाँड खरेदी योजना या वर्षात बंद करण्याची शक्यता आहे. यामुळे विदेशी वित्तीय गुंतवणूकदार संस्थांकडून (एफआयआय) भारतीय बाजारातून पैसे काढून घेण्याबाबत काळजी वाढली आहे. चीनच्या अर्थव्यवस्थेतील सुस्तीने चिंतेत भर टाकली आहे. तेथील पीएमआयची ताजी आकडेवारी निराशाजनक आली आहे. मात्र, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मजबूत मापदंडांमुळे आणि जपानच्या अर्थव्यवस्थेतील सुधारणेच्या अपेक्षेने शेअर बाजारातील सकारात्मक वातावरण टिकून आहे.
सकारात्मक संकेताअभावी शेअर बाजारात चढ-उतार राहण्याची शक्यता आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण बाजारावर परिणाम करत आहे. तर, कच्च्या तेलाच्या घटत्या किमती बाजारातील तोटा कमी करू शकतात. एकूणच बाजारातील कल सतर्कतेसह घसरणीचा राहील.

निफ्टीला पहिला क्रिटिकल अडथळा 5979 पातळीवर होईल. जोपर्यंत निफ्टी या पातळीवर बंद होत नाही तोपर्यंत हा अडथळा धोकादायक आहे. चांगल्या व्हॉल्यूमसह निफ्टी या पातळीवर बंद झाल्यास तेजी येऊ शकते. निफ्टीला त्यापुढील अडथळा 6039 वर होईल. नंतर 6075 वर अडथळा आहे. या पातळीवर काही प्रमाणात कन्सोलिडेशन दिसून येईल. जर निफ्टी कन्सोलिडेट झाला तर 6012 च्या आसपास पातळी शोधण्याची शक्यता आहे. येथे तेजीचा कल दिसला तर निफ्टी 6129 पर्यंत पोहोचू शकतो. या पातळीवर निफ्टी बंद होणे हे मोठ्या तेजीचे संकेत असतील.

शेअर्सच्या बाबतीत या आठवड्यात डाबर इंडिया लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड आणि कोटक महिंद्रा बँक लिमिटेड चार्टवर उत्तम वाटत आहेत. डाबर इंडियाचा मागील बंद भाव 158.90 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 164 रुपये आणि स्टॉप लॉस 153 रुपये आहे. कोल इंडियाचा मागील बंद भाव 325 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 331.50 रुपये आणि स्टॉप लॉस 317 रुपये आहे. कोटक महिंद्रा बँकेचा मागील बंद बाव 767.30 रुपये आहे. त्याचे पुढील टार्गेट 781 रुपये आणि स्टॉप लॉस 752 रुपये आहे.
(लेखक टेक्निकल अ‍ॅनालिस्ट आणि moneyvistas.com चे सीईओ आहेत.)
vipul.verma@dainikbhaskargroup.com