आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजार स्थिर, रुपयाला तरतरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नवे सरकार अस्तित्वात येण्याच्या आधीपासून नवे उच्चांक स्थापन करणाºया शेअर बाजारात बुधवारी सतर्कता दिसून आली. विक्री आणि खरेदीच्या सी-सॉचा खेळ बाजारात चांगलाच रंगला. सत्राअखेर खरेदीचे पारडे किंचित जड झाले. त्यामुळे सेन्सेक्स 6.58 अंकांच्या वाढीसह 24,556.09 वर बंद झाला. निफ्टी 11.65 अंकांच्या कमाईसह 7329.65 वर स्थिरावला. आयटी, तंत्रज्ञान आणि रिअ‍ॅल्टी क्षेत्रातील समभागांवर गुंतवणूकदारांच्या उड्या पडल्या, तर धातू, ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू आणि आॅटो समभागांना विक्रीचा फटका बसला. तिकडे विदेशी मुद्रा विनिमय बाजारात निर्यातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपयाचे मूल्य 11 पैशांनी वधारले.
बाजारात बड्या कंपन्यांपेक्षा लहान कंपन्यांच्या समभागांना चांगली मागणी दिसून आली. बीएसई स्मॉलकॅप निर्देशांक 1.63 टक्क्यांनी वधारला.

विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी मंगळवारी बाजारात 202.61 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याचे प्राथमिक आकडेवारीवरून दिसून आले आहे. बाजाराची नजर आता रिझर्व्ह बँकेच्या पतधोरणाकडे लागली आहे. तसेच जुलैमध्ये सादर होणा-या अर्थसंकल्पावरही गुंतवणूकदारांच्या नजरा आहेत.
निकालावर नजर : निफ्टीकडे नोंदणी असलेल्यांपैकी डझनभर कंपन्या गुरुवारी आपले निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच वायदा सौदापूर्तीची मुदतही गुरुवारी संपते आहे.त्याकडे बाजाराची नजर राहील.
जयंत मंगलिक, अध्यक्ष (रिटेल),रेलिगे अर सेक्युरिटीज
रुपया वधारला : मागील चार दिवसांच्या घसरणीनंतर बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य 11 पैशांनी वधारले. डॉलरच्या तुलनेत रुपयाने 58.93 ही पातळी गाठली.