आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Share Market Subject In School Syllabus News In Divya Marathi

भांडवल बाजाराचा समावेश लवकरच शालेय अभ्यासक्रमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई -आर्थिक साक्षरतेचे पुढचे पाऊल टाकताना ‘सेबी’ने आता भांडवल बाजार विषयाचा शालेय अभ्यासक्रमातच समावेश करण्याची योजना आखली आहे. भांडवल बाजाराशी निगडित वित्तीय संकल्पनेच्या या अतिरिक्त विषय अभ्यासक्रमात घेता येऊ शकेल काय यादृष्टीने विचार करण्यातयेत आहे.

या प्रस्तावावर सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन आणि मनुष्यबळ मंत्रालय यांच्याशी चर्चा केली असून याबाबत विचार करण्यात येईल असे सांगण्यात आल्याचे स्पष्ट करताना बाजार नियंत्रक ‘सेबी’ने म्हटले की 2014- 15 या वर्षासाठीची क्रमिक पुस्तकांच्या फेरआढावा प्रक्रियेच्यावेळी वित्तीय तसेच अशा प्रकारच्या अन्य संकल्पनांचा विचार करण्यात येईल.

आर्थिक साक्षरता जागरूकतेच्या या प्रयत्नांचा अधिकाधिक विस्तार करण्यासाठी बाजार नियंत्रकांनी शाळा, महाविद्यालये आणि व्यावसायिक संस्थांमधील विद्यार्थ्यांना आमंत्रित केले आहे. या इच्छुक विद्यार्थ्यांना भांडवल बाजार नियंत्रक आणि फेब्रुवारी 2011 पासूनची त्यांची भूमिका याबाबत जाणून घेता येईल.

सेबीने आतापर्यंत अमृतसर, पॉँडिचेरी, गोवा, बरेली सारख्या देशातल्या विविध भागात 139 वेळा भेटी दिल्या आहेत. या भेटीत व्यवस्थापन, वाणिज्य, बॅँका, कायदा, कला, विज्ञान अशा विविध शाखांमधील अभ्यासक्रमांचा आढावा सेबीने घेतला आहे.