आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिन्याभराचा उच्चांक; सेन्सेक्समध्ये 189 अंकांची उसळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सौदापूर्ती सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून भांडवल बाजारात आलेली तेजी सलग दुस-या दिवशीही कायम राहिली. विदेशी बाजारपेठेतील स्थिर वातावरण आणि त्यातच अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी दिलेल्या व्याजदर कपातीच्या संकेतामुळे गुंतवणुकदारांनी बॅँका, वाहन, स्थावर मालमत्ता आणि माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या केलेल्या तुफान खरेदीमध्ये सेन्सेक्समध्ये 189 अंकांनी झेपावला.
गेल्या सत्रात 215 अंकांची उसळी घेतल्यानंतर मंगळवारी त्यात आणखी 188.82 अंकांची भर पडली. दिवसअखेर सेन्सेक्स 17,601.78 अंकांच्या पातळीवर बंद झाला. सलग दुस-या दिवशी सेन्सेक्सने इतकी मोठी झेप घेतली आहे. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकात 54.15 अंकांची वाढ होऊन तो 5336.70 अंकांच्या पातळीवर बंद झाला.
बॅँका, वाहन, स्थावर मालमत्ता क्षेत्रातील समभागांची तुफान खरेदी करून गुंतवणूकदारांनी आनंद व्यक्त केला. विशेष म्हणजे तेल आणि वायू तसे ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांक वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांक चमकले. गुंतवणूकदारांची श्रीमंती 40 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढून ती 61.75 लाख कोटी रुपयांवर गेली.
सरकारकडून काही धोरणात्मक उपाययोजना जाहीर करण्याची शक्यता आहे. तसेच नजिकच्या काळा व्याजदरात कपात करण्याच्या आशा देखील पल्लवित झाल्या असल्याचे बोनान्झा पोर्टफोलिओच्या वरिष्ठ संशोधक विश्लेषक निधी सारस्वत यांनी सांगितले.बाजारात झालेल्या खरेदीत टाटा मोटर्स, गेल, बजाज ऑटो आणि आयसीआयसीआय बॅँक यांच्या समभाग खरेदीमुळे सेन्सेक्सला मोठी झेप घेता आला. अमेरिकेतील शेअर बाजारात नोंदणी असलेल्या कॉग्निझंटने दुस-या तिमाहीत लक्षणीय आर्थिक कामगिरी केल्यामुळे इन्फोसिस आणि विप्रोसह अन्य आयटी कंपन्यांच्या समभागांची चांगली खरेदी झाली.
टॉप गेनर्स - टाटा मोटार्स, गेल, टीसीसी, बजाज ऑटो, आयसीसी बँक, स्टेट बँक, इन्फोसिस, जिंदल स्टील, टाटा पॉवर,एचडीएफासी.
टॉप लूजर्स - हीरो मोटाकॉर्प, भारती एअरटेल, सन फार्मा, रिलायन्स, डॉ. रेड्डी लॅब्स.