आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधी घसरण, मग कमाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पावसाबरोबरच युरोझोनच्या चिंतेमुळे सकाळच्या सत्रात जवळपास 200 अंकांनी घसरलेल्या सेन्सेक्सला युरोप शेअर बाजाराने आधार दिला. दुपारच्या सत्रानंतर युरोप शेअर बाजारात आलेल्या तेजीमुळे बाजारात झालेल्या खरेदीत सेन्सेक्समध्ये 26 अंकांनी वाढ झाली
युरोप शेअर बाजारात आलेली तेजी आणि त्याच्याच जोडीला विप्रो, एनटीपीसी, डॉ. रेड्डीज लॅब, रिलायन्स, इन्फोसिस, एचडीएफसी बॅँक यांच्या समभागांची चांगली झालेली खरेदी यामुळे सेन्सेक्स दिवसअखेर 26.43 अंकांनी वधारून 17,197.93 अंकांच्या पातळीवर बंद झाला. राष्टÑीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांक 12.05 अंकांनी वाढून 5215.70 अंकांच्या पातळीवर बंद झाला. त्याअगोदर निफ्टीने 5164.65 अंकांची नीचांकी पातळी गाठली होती.
धातूंची मागणी कमी झाल्यामुळे स्टर्लाइट, टाटा स्टील, जिंदाल स्टील यांच्या समभागांना जास्त फटका बसला. पण त्याचबरोबर व्याजदरात कपात न झाल्यामुळे बॅँकांच्या समभागांवरदेखील विक्रीचा ताण आला. अपु-या पावसामुळे ग्रामीण भागातील उत्पन्न घटून ऐन सणासुदीच्या हंगामात वाहनांची विक्री घटण्याच्या भीतीमुळे महिंद्रा अ‍ॅँड महिंद्रा, टाटा मोटर्स यासारख्या वाहन कंपन्यांच्या समभागांना विक्रीमुळे रिव्हर्स गिअर टाकावा लागला.