आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेअर बाजारात सलग दुस-या दिवशी तेजीची गुढी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- महागाई आणि औद्योगिक उत्पादनाची आकडेवारी शुक्रवारी जाहीर होण्याच्या अगोदरच इन्फोसिस, आयसीआयसीआय बॅँक आणि टाटा मोटर्स या बड्या समभागांच्या किमतीत लक्षणीय 3 ते 4 टक्क्यांची वाढ झाली. बाजारातील खरेदीच्या बळावर सेन्सेक्सने 127.75 अंकांची वाढ झाली. सलग दुस-या दिवशी तेजीची गुढी उभारताना सेन्सेक्सने 18,542.20 अंकांची एका आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रातच चांगल्या पातळीवर उघडला. त्यानंतर तो दिवसभरात 18,599.14 आणि 18,397.94 अंकांच्या पातळीत राहिला. बुधवारच्या 187.97 अंकांच्या उसळीनंतर सलग दुस-या दिवशीही सेन्सेक्सने 127.75 अंकांची झेप घेतली. सेन्सेक्सने तीन एप्रिलनंतर पहिल्यांदाच कमाल पातळी गाठली. राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टीचा निर्देशांकदेखील 35.30 अंकांनी वाढून तो 5594.00 अंकांच्या पातळीवर बंद झाला. खरेदीत प्रामुख्याने स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, बॅँकाच्या समभागांना मागणी आली. बाजाराची नजर आता महागाईच्या आकडेवारी कडे लागली आहे.

अगोदरच या समभागांच्या खरेदीवर भर दिला. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी इन्फोसिसचा तिमाही निकाल शुक्रवारी जाहीर होणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या अगोदरच माहिती तंत्रज्ञान समभागांवर उड्या पडल्या. विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी बुधवारी भांडवल बाजारात 40.22 कोटी रुपयांची समभाग खरेदी केल्यामुळेदेखील गुंतवणूकदारांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाला.

टॉप गेनर्स
टाटा मोटर्स, आयसीआयसीआय बॅँक, एल अ‍ॅँड टी, सन फार्मा, सिप्ला, ओएनजीसी, एचडीएफसी बॅँक, मारुती सुझुकी, स्टेट बॅँक
टॉप लुझर्स
टाटा स्टील , भारती एअरटेल, एचडीएफसी, एनटीपीसी, बजाज ऑटो, रिलायन्स, टाटा पॉवर