आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नफेखोरीत सेन्सेक्स आपटला, तेजीची ऊर्जा घसरली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भाजपचे सरकार आल्यापासून नवे नवे उच्चांक गाठणार्‍या बाजाराला मंगळवारी नफारूपी विक्रीचे ग्रहण लागले. ऊर्जा आणि तेल कंपन्यांच्या समभागांची जोरदार विक्रीने बाजारातील तेजीची ऊर्जा घसरली. सेन्सेक्स 167.37 अंकांनी घसरून 24,549.51 पर्यंत खाली आला. निफ्टी 41.05 अंकांच्या घटीसह 7,318.00 वर स्थिरावला.
मंत्र्यांचे खातेवाटप, जागतिक बाजारातील नकारात्मक कल आणि डेरिव्हेटिव्ज व्यवहारांची सौदापूर्ती यांचाही परिणाम बाजारावर दिसून आला. गेल इंडिया, एचडीएफसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, एसबीआय, ओएनजीसी, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, टीसीएस आदी समभाग घसरले. इन्फोसिस, एल अँड टी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील आदी समभाग वधारले.