आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shariah Based Fund Has Given Nearly 43 Per Cent Return

फंडांतून 60 हजार कोटी निधीचा उपसा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मागील दोन महिन्यांत म्युच्युअल फंड योजनांमधून जवळपास दीड लाख कोटी रुपयांचा निधी बाहेर गेला आहे. परंतु अद्यापही घसरण थांबलेली नाही. जून महिन्यात जवळपास 60 हजार कोटी रुपयांचा निधी गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड योजनांमधून काढून घेतला असल्याचे ‘सेबी’कडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीमध्ये म्हटले आहे.
गेल्या जून, जुलै या दोन महिन्यांत अनुक्रमे 59,726 कोटी रुपये आणि 1,46,094 कोटी रुपयांचा निधी म्युच्युअल फंड उद्योगातून बाहेर गेला आहे. मे महिन्यात गुंतवणूकदारांनी विविध म्युच्युअल फंड योजनांमध्ये 33,661 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण त्याअगोदर एप्रिल महिन्यात अनेक म्युच्युअल फंड उत्पादनांमधून 1.12 लाख कोटी रुपयांचा निधी काढून घेण्यात आला. ढोबळ माध्यमातून म्युच्युअल फंडांनी विविध योजनांमधून जून महिन्यात 8.92 लाख कोटी रुपयांचा निधी संकलित केला, त्याचबरोबर 9.51 लाख कोटीचा निधी काढून घेतला. त्यामुळे फंड उद्योगातून एकूण 59,726 कोटीचा निव्वळ निधी बाहेर गेला आहे.