कौटुंबिक व्यवसाय बंद झाल्यानंतर शशी मुंबईत आले. नोकरीच्या शोधात ते एक दिवस डॉक यार्डात पोहोचले. पहिल्यांदाच मोठमोठी जहाजे पाहून ते भारावून गेले. त्यामुळे याच क्षेत्रात काहीतरी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एका छोट्या जहाज कंपनीतून त्यांनी नोकरीला सुरुवात केल्यानंतर ते टाटाच्या फोर्ब्स गोकाक कंपनीत रुजू झाले.
काम करताना या क्षेत्राशी संबंधित लोकांशी मैत्री केली. दररोज जहाजाचे कॅप्टन, व्यवस्थापक, डाक यार्ड स्टाफ आणि ट्रक मालकांशी भेटत राहिले. या कामात चार वर्षे गेली. २५ हजार रुपये जमा झाल्यानंतर
आपल्या व्यवसायाचा विचार करू लागले. पी डिमेलो रोडवरील व्यापार भवनातील एका खोलीत त्यांनी कार्यालय सुरू केले. चार लोकांचा स्टाफ होता. ओळखीच्या लोकांकडून काही ट्रक भाड्याने घेतले. त्यामुळे जहाजापर्यंत माल पोहोचण्याचे काम सुरू झाले. महिन्याऐवजी दररोज पेमेंट घेऊ अशी अट त्यांनी जहाज कंपन्यांना घातली. येथूनच त्यांच्या ट्रान्स इंडिया फ्राइट सर्व्हिसेसची सुरुवात झाली. कमाईतील ऱक्कम उपकरण खरेदीसाठी वापरत होते. आपल्या कौटुंबीक व्यवसायातील नुकसानीतून धडा घेत त्यांनी फायनान्सशी संबंधित व्यवसाय सोडला. काम वाढल्यानंतर देशात उदारीकरणाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे त्यांनी जहाज व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आणि ऑल कार्गो ग्लोबल लॉजिस्टीक कंपनी सुरू केली.
कौटुंबिक व्यवसायबंद झाल्यानंतर शशी मुंबईत आले. नोकरीच्या शोधात ते एक दिवस डॉक यार्डात पाेहोचले. पहिल्यांदाच मोठमोठी जहाजे पाहून ते भारावून गेले. त्यामुळे याच क्षेत्रात काहीतरी काम करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. एका छोट्या जहाज कंपनीतून त्यांनी नोकरीला सुरुवात केल्यानंतर ते टाटाच्या फोर्ब्स गोकाक कंपनीत रुजू झाले.
काम करताना या क्षेत्राशी संबंधित लोकांशी मैत्री केली. दररोज जहाजाचे कॅप्टन, व्यवस्थापक, डाक यार्ड स्टाफ आणि ट्रक मालकांशी भेटत राहिले. या कामात चार वर्षे गेली. २५ हजार रुपये जमा झाल्यानंतर आपल्या व्यवसायाचा विचार करू लागले. पी डिमेलो रोडवरील व्यापार भवनातील एका खोलीत त्यांनी कार्यालय सुरू केले. चार लोकांचा स्टाफ होता. ओळखीच्या लोकांकडून काही ट्रक भाड्याने घेतले. त्यामुळे जहाजापर्यंत माल पोहोचण्याचे काम सुरू झाले. महिन्याऐवजी दररोज पेमेंट घेऊ अशी अट त्यांनी जहाज कंपन्यांना घातली. येथूनच त्यांच्या ट्रान्स इंडिया फ्राइट सर्व्हिसेसची सुरुवात झाली. कमाईतील ऱक्कम उपकरण खरेदीसाठी वापरत होते. आपल्या कौटुंबीक व्यवसायातील नुकसानीतून धडा घेत त्यांनी फायनान्सशी संबंधित व्यवसाय सोडला. काम वाढल्यानंतर देशात उदारीकरणाचे वातावरण तयार झाले होते. त्यामुळे त्यांनी जहाज व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला आणि ऑल कार्गो ग्लोबल लॉिजिस्टीक कंपनी सुरू केली.
- जन्म - १९५७,कन्नड, कर्नाटक)
- शिक्षण: वाणिज्यपदवीधर
- कुटुंब:पत्नीआरती कंपनीमध्ये संचालक आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. भाऊ उमेशचीही व्यवसायात मदत.
- चर्चेत - त्यांनी बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा मुंबईतील बंगला आशीर्वाद विकत घेतला आहे.
शशिकिरण शेट्टी - एक्झिक्युटीव्ह चेअरमन, ऑल कार्गो लॉजिस्टिक लि.
पुढील स्लाईडवर पाहा... शशि किरण यांच्या व्यक्तीगत जीवनातील काही खास फोटो