आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shobhana Bhartiya, Priya Poll, And Chanda Kochar In Forbes Magazine

फोर्ब्जच्या यादीत शोभना, प्रियासह चंदा यांचा समावेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- आपल्या कामगिरीमुळे फोर्ब्जच्या जागतिक व्यासपीठावर मानाचे स्थान मिळवण्यात आठ भारतीय महिला व्यावसायिक यशस्वी ठरल्या आहेत. फोर्ब्ज आशियाच्या 50 टॉप महिला व्यावसायिकांच्या यादीत मीडिया घराण्याच्या संचालिका शोभना भारतीया, हॉटेल व्यावसायिक प्रिया पॉल आणि बँकर चंदा कोचर यांचा समावेश करण्यात आला आहे.

अमेरिकेतील प्रख्यात व्यापारिक नियतकालिक असलेल्या फोर्ब्जने सांगितले की, चीनमधील मंदी, कमकुवत आर्थिक सुधारणा आणि युरोपीय चलन संघटनेच्या चिंतेनंतरही या महिलांनी अधिकाधिक नफा मिळवण्यात बाजी मारली आहे. आव्हानात्मक आर्थिक परिस्थितीतही आपल्या व्यावसायिक क्षेत्रातील सक्रियतेच्या आधारावर यादीतील 50 महिलांची निवड करण्यात आली आहे.

यादीत समावेश असलेल्या हॉटेल व्यावसायिक प्रिया पॉल यांनी वडिलांच्या निधनानंतर व्यवसायाची धुरा आपल्या हाती घेत नव्या हॉटेल्सची शृंखला उभारली. एचटी मीडियाच्या चेअरमन आणि संपादकीय संचालक शोभना भरतिया, आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ चंदा कोचर, बायोकॉन इंडियाच्या संस्थापक, चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक किरण शॉ मुजुमदार यांच्या नावांचाही समावेश आहे. याशिवाय यादीत नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या संयुक्त संचालक चित्रा रामकृष्णा, मल्टिपल्स अल्टरनेट अँसेट मॅनेजमेंट इंडियाच्या संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ रेणुका रामनाथ, अपोलो हॉस्पिटलच्या समूह व्यवस्थापकीय संचालक प्रीता रेड्डी आणि अँक्सिस बँकेच्या सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक शिखा शर्मा यांनाही स्थान देण्यात आले आहे.

यादीत चीनच्या सर्वाधिक 16 महिलांचा समावेश आहे. भारत आणि हाँगकाँगच्या प्रत्येकी आठ महिलांनाही हा बहुमान मिळाला आहे.