आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Silence On Ranbaxy Supply Resumption Still A Worry

रॅनबॅक्सीला झटका, 2736.5 कोटी रुपयांचा दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/वॉशिंग्टन - औषधनिर्मिती करणार्‍या रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज लिमिटेडला औषध सुरक्षा तरतुदींच्या उल्लंघनाप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. कंपनीने आरोप स्वीकार करत अमेरिकी विधी मंत्रालयाशी केलेल्या समझोत्यांतर्गत 50 कोटी डॉलर्स (सुमारे 2736.50 कोटी रुपये) दंड भरण्यास सहमती दिली आहे. यापैकी एका दिवाणी दाव्यांतर्गत रॅनबॅक्सीचे माजी कर्मचारी व व्हिसलब्लोअर दिनेश ठाकूर यांना 4.87 कोटी डॉलर (सुमारे 266.53 कोटी रुपये) मिळणार आहेत. ठाकूर आधी रॅनबॅक्सीच्या बौद्धिक संपदा विभागात काम करत होते. त्यांनी पाच वर्षांपूर्वी कंपनीला रामराम ठोकला होता. यानंतर त्यांनी कंपनीविरुद्ध कायदेशीर लढा उभारला.

अमेरिकी सरकारनुसार औषध सुरक्षेच्या मुद्द्यावर एखाद्या जेनेरिक औषधनिर्मात्या कंपनीसोबत करण्यात आलेला हा सर्वात मोठा समझोता आहे. यात 15 कोटी डॉलर दंडाच्या रूपात वसूल करून ते सरकारी तिजोरीत जमा केले जातील. 35 कोटी डॉलरमधून अनेक दिवाणी दाव्यांच्या रकमांची पूर्तता करण्यात येईल. रॅनबॅक्सीने या समझोत्यानुसार अनेक आरोप मान्य केले आहेत. 2008 मध्ये एफडीएने भारतात तयार होणार्‍या औषधांत त्रुटी आढळल्यानंतर कंपनीच्या 30 औषधांच्या विक्रीवर अमेरिकेत बंदी लादली होती.

शेअर्स घसरले, सावरले
मंगळवारी सेन्सेक्समध्ये रॅनबॅक्सीचे शेअर्स आधी घसरले, मात्र पुन्हा सावरले. कंपनीचे शेअर्स 3.63 टक्क्यांनी वधारून 455.50 रुपयांवर बंद झाले.

चुकांची दिली कबुली
भारतीय कारखाने औषधनिर्मितीच्या मापदंडांवर उतरत नसल्याचे व अमेरिकी हेल्थ केअर प्रोग्रॅमअंतर्गत चुकीचे दावे करण्यात आल्याचे कंपनीने मान्य केले.