आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांदी होणार ३७ हजार, जागतिक परिस्थितीमुळे चांदीची चकाकी काळवंडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या तेजीला घसरणीचा लगाम लागला आहे. त्यापाठोपाठ चांदीची चकाकीही काळवंडते आहे. चांदी आता किलोमागे ३७ हजारांपर्यंत खाली येऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी ४ वर्षांच्या नीचांकी पातळीवर पोहोचली आहे, तर डॉलर इंडेक्स ४ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. त्याचाच दबाव मौल्यवान धातूंच्या किमतीवर दिसून येत आहे. तसेच सोन्यात झालेल्या मोठ्या घसरणीचा परिणाम चांदीच्या किमतीवर दिसतो आहे.शिवाय गुंतवणूकदार शेअर बाजाराकडे आकृष्ट झाल्यानेही चांदीची मागणी घटली आहे.

देशातील सराफ्यात चांदी किलोमागे ३९ हजार रुपयांखाली घसरली आहे. जागतिक सराफ्यात स्पॉट चांदी औंसमागे १७.३० डॉलरपर्यंत घसरली आहे. जून २०१० नंतर प्रथमच चांदी या स्तरावर आली आहे, तर कमोडिटी इंडेक्स बाजारात (कॉमेक्स) चांदी १७.५६ डॉलरच्या पातळीत आही. जाणकारांच्या मते, छोट्या कालावधीसाठी चांदी किलोमागे ३७,००० रुपयांखाली येण्याची शक्यता आहे.

गुंतवणूकदारांसाठी सल्ला
* ट्रेड स्विफ्टचे संदीप जैन यांच्या मते, चांदी या आठवड्यात िकलोमागे ३७ हजार रुपयांपर्यंत घसरू शकते. संदीप यांच्या मते, तांत्रिकदृष्ट्या फंडामेंटलसह चांदीत घसरणीचा कल आहे. सोने मोठ्या प्रमाणात घसरूनही चांदीत घसरण झाली नव्हती. मात्र आता चांदी सध्याच्या पातळीपेक्षा २००० रुपयांनी आणखी घसरण्याची शक्यता संदीप यांनी व्यक्त केली.
* एंजेल कंमोडिटीचे अनुज गुप्ता यांच्या मते, चांदी किलोमागे ३८ हजारांपर्यंत खाली येऊ शकते. खरे तर सोन्यातील सुरक्षित गुंतवणुकीची मागणी कमी होत असल्याने सोन्यात मोठी घसरण दिसते आहे. सोन्यातील घसरणीचा दबाव चांदीवर दिसून येत आहे.
* दिल्लीतील सराफा व्यापारी कृष्ण गोयल चांदीवाला यांच्या मते, यंदाच्या सणाच्या हंगामात चांदीच्या मागणीत २५ ते ३० टक्के घट होण्याची शक्यता आहे. सध्याच्या पातळीत चांदीच्या किमतीत फारशी घट होणार नसल्याचे मत चांदीवाला यांनी व्यक्त केले.
घसरणीची कारणे
प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलरमध्ये जोरदार तेजी आली आहे. युरोच्या तुलनेत डॉलर १४ महिन्यांच्या उच्चांकावर आहे. सध्या एक युरोचे मूल्य १.२८३ डाॅलर आहे. मागील सत्रात युरोने नीचांकी पातळी गाठली होती, जो १४ महिन्यांचा नीचांक आहे. डॉलर इंडेक्स ४ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला होता.

जागतिक स्तरावर कोठेही तणाव वाढल्यास गुंतवणूकदार सराफा बाजारात सुरक्षेच्या दृष्टीने गुंतवणूक करतात. त्यामुळे किमतीला आधार िमळतो. मागील काही महिन्यांत जगातील तणावामुळे सोन्यात तेजी िदसली होती. मात्र, आता तणाव िनवळताच सुरक्षित गुंतवणुकीची गरज कमी झाली असून मागणी घटली आहे. सोन्यातील मोठ्या घसरणीमुळे चांदीच्या िकमतीवर मोठा दबाव िदसून येईल.

जगभर सध्या शेअर बाजारात तेजी िदसत आहे. देशातील शेअर बाजारांनी मागील वर्षभरात ३२ टक्के तेजी दर्शवली आहे. जाणकारांच्या मते, बाजारात आगामी काळात तेजी राहील, शेअर्सकडून िमळणा-या चांगल्या परताव्यामुळे भांडवल बाजाराकडे वळले आहेत.