आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिमट्रॉनिक्सने आणला सर्वात कमी किमतीचा टॅब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सिमट्रॉनिक्स सेमीकंडक्टर्स लिमिटेड या कंपनीने ‘एक्सपॅड एक्स-1010’ हे सर्वात स्वस्त आणि 10.1 इंच आकारातील टॅब्लेट उपकरण भारतात तयार केले आहे. अ‍ॅन्डओईड 4.0 आयसीएसवर आधारित सिमट्रॉनिक्स एक्सपॅड एक्स-1010 मध्ये 10.1 इंच आकाराचा डिस्प्ले आणि 1.2 गीगाहर्टझ-ए 8 क्षमतेचा कोर्टेक्स प्रोसेसर आहे.
भारत आणि परदेशातील अनेक ओईएम करिता सिमट्रॉनिक्स टॅब्लेट्स तयार करते.

आमच्या ग्राहकांसाठी विशेष नावीन्यपूर्ण उत्पादने सादर करण्याच्या आमच्या व्यावसायिक धोरणांतर्गत आणलेल्या या नव्या टॅबचा स्क्रीन आकाराने मोठा असून ते सहजपणे काम करते. या टॅब्लेट पीसीच्या मदतीने तुमचे काम तर सहजसोपे होतेच, पण त्याचबरोबर थ्रीजी स्पीडने इंटरनेट पाहण्यासाठी हे उपकरण यूएसबी
डोंगल्सची मदतही करते.

या टॅब्लेटमध्ये 10.1 इंच आकाराचा मोठा आणि पसरट स्क्रीन असल्यामुळे त्यावर मोठ्या
आकारातील मॅगेझिन्स आणि एॅप्स व्यवस्थितपणे पाहता येतात. तसेच हा स्क्रीन उभा किंवा आडवा देखील पाहता येऊ शकतो, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक इंद्रजित सबरवाल यांनी सांगितले.
सिमट्रॉनिक्स ही कंपनी टॅब्लेट उपकरणांची निर्मिती भारतात करते आणि यापूर्वी या कंपनीने दोन टॅब्लेट्स उपकरणे सादर केली आहेत. यापैकी पहिले आहे एक्स 720 हे सात इंच आकाराचे
उपकरण वाय-फाय कनेक्टिव्हिटीसह उपलब्ध असून किंमत रु.4600/- इतकी आहे. तसेच दुसरे एक्स पॅड एक्स 801 उपकरण रु.8449/- मध्ये उपलब्ध आहे.
‘एक्सपॅड एक्स-1010’ची वैशिष्ट्ये
* एक जीबी रॅम, मल्टी टच क्षमता, 1024 ७ 600 पिक्सेल रिझोल्युशन
* इंटर्नल मेमरी 8 जीबी, 32 जीबीपर्यंत विस्तारक्षम
* व्हिडिओ चॅट करण्यासाठी पुढील बाजूस व्हीजीए कॅमेरा
* कॉप्रेस्ड किंवा अनकॉप्रेस्ड आणि एलपीसीएम आॅडिओ, महत्त्वाच्या माहितीचे अदान-प्रदान करता येते आणि व्हेसा ईडीआयडीकरिता हे उपकरण मदतकारक ठरते.
* एचडीएमआय तंत्रज्ञानाच्या मदतीने टीव्ही किंवा संगणकाच्या मॉनिटरवर छायाचित्रे पाठवता येतात.
* लिथियम बॅटरी 5600 एमएएच इतक्या
मोठ्या क्षमतेची, 150 तासांचा बॅक अप,
* सहा तास इंटरनेट ब्राउजिंग करण्याची क्षमता
* कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय आणि एचडीएमआय तंत्रज्ञान