आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Singapor Airlines Give Special Cession To Passengers

सिंगापूर एअरलाइन्सची प्रवाशांसाठी तिकिटांवर विशेष सवलत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबईहून सिंगापूर व ऑस्टेÑलियाला जाणा-या प्रवाशांचा ओघ वाढावा या उद्देशाने सिंगापूर एअरलाइन्सने सर्वसमावेशक विशेष प्रवासभाडे घोषित केले आहे. मर्यादित काळासाठी सवलतीच्या दरात ते आकारण्यात येणार आहे. यानुसार मुंबईहून सिंगापूरला जाण्यासाठीचे भाडे 21 हजार रुपयांपासून सुरू होत असून ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठीचे भाडे 58 हजार रुपयांपासून सुरू होत आहे.
सध्याच्या वेळापत्रकात यासाठी तजवीज करण्यात आली असून सिंगापूरसाठी मुंबईहून तीन विमाने सोडण्यात येणार आहेत. सिंगापूरहून ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी 120 विमाने सोडण्यात येणार आहेत. ही विमाने ऑस्ट्रेलियात अ‍ॅडलेड, ब्रिस्बेन, डार्विन, मेलबर्न, पर्थ व सिडनी येथे थांबतील. सिंगापूरला या विशेष सवलतीत जाऊ इच्छिणा-यांना 15 फेब्रुवारीपर्यंत आरक्षण करणे आवश्यक आहे. हे आरक्षण 15 जानेवारी ते 15 एप्रिल या काळासाठी तसेच 1 जून ते 31 जुलै या कालावधीसाठी राहील. ऑस्ट्रियासाठी 31 जानेवारीपर्यंत विशेष सवलत सुरू राहणार आहे.