आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिंगल किंवा जॉइंट विमा पॉलिसीपैकी कोणती चांगली ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वत:च्या विमा संरक्षणासाठी सिंगल विमा पॉलिसी खरेदी केली जाते, तर जॉइंट विमा पॉलिसीच्या माध्यमातून पती किंवा पत्नीचे विमा संरक्षण केले जाते. अशा परिस्थितीत एखादे जोडपे जेव्हा आयुर्विमा खरेदीचा विचार करते तेव्हा त्यांच्यासमोर सिंगल पॉलिसी घ्यावी की जॉइंट (संयुक्त) पॉलिसी घ्यावी, असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा या दोन्ही पॉलिसींचे फायदे-तोटे माहिती असणे आवश्यक आहे. सिंगल विमा पॉलिसीद्वारे ज्याच्या नावे पॉलिसी आहे त्यास विमा संरक्षण मिळते. पॉलिसीच्या काळात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला विमा रक्कम मिळते.

जॉइंट आयुर्विमा पॉलिसीमुळे पत्नी किंवा पतीलाही विमा संरक्षण मिळू शकते. सर्वसाधारणपणे ही पॉलिसी दोघांपैकी कोणाचाही दुर्दैवी मृत्यू आधी झाल्यास या तत्त्वावर आधारित असते. म्हणजे, पॉलिसी काळात दोघांपैकी कोणाचाही मृत्यू आधी झाल्यास त्याच्या साथीदारास विमा रक्कम दिली जाते. त्यानंतर पॉलिसी संपते.

जॉइंट पॉलिसी विरुद्ध दोन वेगवेगळ्या पॉलिसी : विमाधारकाने आपल्या जीवनसाथीसह संयुक्त पॉलिसी घ्यावी की वेगवेगळ्या पॉलिसी घ्याव्यात हे कशा स्वरूपाचा विमा खरेदी करायचा आहे, त्यावर अवलंबून असते. संयुक्त प्रकारात (जॉइंट) एकाच पॉलिसीद्वारे पती-पत्नीस विमा संरक्षण मिळते आणि प्रीमियम एकाच पॉलिसीसाठी द्यावा लागतो, तर वेगवेगळ्या पॉलिसी खरेदी केल्यास वेगवेगळा प्रीमियम भरावा लागतो.

अशा प्रकारे जॉइंट पॉलिसी सिंगल विमा पॉलिसीच्या तुलनेत स्वस्त पडते. मात्र, पती-पत्नीपैकी एकाच्या मृत्यूनंतर दुसर्‍या व्यक्तीचे विमा संरक्षण संपुष्टात येते. अशा स्थितीमुळे मुलांच्या आर्थिक संरक्षणासाठी वेगवेगळे विमा संरक्षण घ्यावे लागते.

वेगवेगळ्या पॉलिसी घेतल्यास पती-पत्नीचे विमा संरक्षण दुप्पट होते. तसेच वेगवेगळ्या रकमेचे विमा संरक्षण करता येते. संयुक्त पॉलिसी घेतल्यानंतर काही कारणांनी नातेसंबंध बिघडल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. अशा स्थितीत वेगवेगळ्या विमा पॉलिसी फायदेशीर ठरतात. तसेच उभयतांपैकी एकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास दुसरी व्यक्ती प्रीमियम भरत विमा संरक्षित राहू शकते. त्यामुळे वाढत्या वयात जास्त रकमेच्या विमा खरेदीपासूनही तो मुक्त राहू शकतो.

- लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.

suresh.narula@dainikbhaskargroup.com