आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबादेत निर्मित कारवर स्कोडाचा भर; कॉम्पॅक्ट कारची विक्री बंद करणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- कॉम्पॅक्ट कारची विक्री बंद करून येती, सुपर्बसारख्या व्यावसायिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कारच्या विक्रीवर भर देणार असल्याचे स्कोडा या कंपनीने सोमवारी स्पष्ट केले. या दोन्ही कारची निर्मिती स्कोडाच्या औरंगाबादेतील प्रकल्पात होते.

कंपनीने प्रीमियम एक्झिक्युटिव्ह सेडान र्शेणीतील सुपर्ब कार सादर केली. या कारची किंमत 18.87 लाख (पेट्रोल)आणि 25.2 लाख रुपये (डिझेल)आहे. 2013 मध्ये कंपनीने चांगली व्यवसाय सुधारणा केली. यंदा विक्री पश्चात सेवेवर भर देण्याची योजना आहे. त्यासाठी सुपर्ब व येती (एसयूव्ही) या दोन कारवर लक्ष केंद्रित करण्याची कंपनीची योजना आहे.

औरंगाबाद, मुंबईतून सेवा
स्कोडा ऑटो इंडियाचे सीएमडी सुधीर राव यांनी सांगितले, धोरणानुसार पुण्यातील विक्री पश्चात सेवा देणारे कार्यालय बंद केले आहे. कंपनी आता मुंबई आणि औरंगाबादेतून सेवा देणार आहे. पुण्यातील कार्यालयात 25 जण कार्यरत होते त्यांना इतरत्र हलवण्यात आले आहे.

जग्वारमुळे टाटाच्या नफ्यात वाढ
मुंबई- सर्वात स्वस्त कार विकणार्‍या टाटा मोटर्सच्या नफ्यात डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत तिप्पट वाढ झाली आहे. जग्वार या सहयोगी कंपनीमुळे टाटाच्या नफ्यात भर पडण्याची ही सलग आठवी तिमाही आहे. टाटा मोटर्सचे सीएफओ सी. रामकृष्णन म्हणाले, कंपनीला या तिमाहीत 4805 कोटी नफा झाला आहे. गतवर्षी हा नफा 1628 कोटी होता. 2008 मध्ये आजारी कंपनी म्हणून टाटाने जग्वार घेतली होती.