आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्कोडाचे थ्री-स्पोक स्टिअरिंग व्हीलयुक्त अत्याधुनिक मॉडेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्कोडा सुपर्ब 2.0 टीडीआय
कारमध्ये स्कोडाच्या लोगोसह बटरफ्लाय ग्रिल, रीशेप्ड हेडलँप आणि फॉग लँप देण्यात आले आहे. कारचे बंपर आणि बोनट पुन्हा डिझाइन केले गेले आहे. यातील एलईडी डेटाइम रनिंग लँपमध्ये नवे बाय-जीनॉन हेडलँप लावलेले आहेत. कारमध्ये मागील बाजूने केलेले बदल सहज दिसून येतात. सर्वप्रथम न्यू पार्ट-एलईडी टेललँप दिसतात. ते ऑडीसारखे आहेत. रियर बंपर, स्पॉयलर आणि बूट लीडला अँग्युलर शेप देण्यात आला आहे. बूट लीड हे टू-टोन स्कोडा बॅज आणि गाडीचे ‘सुपर्ब’ हे नाम सेंटरपासून लीडच्या उजव्या बाजूला खाली देण्यात आले आहे.चाकांमध्ये बदल पाहण्यास मिळत आहे. त्याचे 16 इंच, 10 स्पोक ‘हेलिक्स’ अलॉय व्हीलचे शार्प अँसेंट लूक जेट टर्बाइनसारखे आहेत.
टेरिअरमध्ये नावीन्य नाही :नव्या कारचे इंटेरिअर फार काही बदलण्यात आले नाही. यातील थ्री-स्ट्रोक स्टिअरिंग व्हील ही नवी संकल्पना आहे. 3.6 लिटर व्ही 6 पेट्रोल इंजिनची मागणी कमी असल्यामुळे स्कोडाने त्याचे उत्पादन बंद केले आहे. टीएसआय मोटर सिक्स-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा सेव्हन-स्पीड डीएसजी ऑटोमॅटिक आहे, तर टीडीआय सिक्स-स्पीड डीएसजीयुक्त आहे. इन्स्ट्रुमेंट्समध्येही अनेक बदल झाले आहेत. गाडी सुरू करण्यासाठी पुश बटण आहे. बेस अँम्बिशन ट्रिममध्ये बोलेरो ऑडिओ प्लेअरसह सीडी चेंजर आणि ब्लूटूथ टेलिफोनी देण्यात आले आहे. फेसलिफ्ट मॉडेलच्या किमतीतही काही बदल झालेले दिसले.
या कारचे फिचर्स जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर किल्क करा...