आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Skoda's Activa Production Increases In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्कोडाच्या औरंगाबाद प्रकल्पात ऑक्टाव्हियाच्या निर्मितीला वेग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/औरंगाबाद - बारा वर्षांपूर्वी भारतीय कारप्रेमींना मोहिनी घालणारी स्कोडा ऑक्टाव्हिया ही सेडान कार सणाच्या हंगामात रस्त्यावर धावण्यास सज्ज आहे. स्कोडाच्या शेंद्रा येथील प्रकल्पात ऑक्टाव्हियाच्या निर्मितीने वेग घेतला आहे.


या मोटारीचे उत्पादन ऑक्टोबर 2010 मध्ये थांबवण्यात आले होते. परंतु ही कार पुन्हा वाहन बाजारात उपलब्ध करून देणार असल्याची माहिती कंपनीचे सीईओ विनफ्रेड वाहलॅँड यांनी दिली. नोव्हेंबर (2001) ते ऑक्टोबर (2010) या कालावधीत कंपनीने 44,900 ऑक्टाव्हिया मोटारींची विक्री झाली होती. यंदाच्या सणामध्ये नव्या पिढीतील ऑक्टाव्हियाची भेट भारतीय ग्राहकांना मिळणार असल्याचे स्कोडा ऑटो इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सुधीर राव यांनी सांगितले.


स्कोडाच्या औरंगाबादनजीक शेंद्रा प्रकल्पात सुपर्ब, येती आणि लॉरा याबरोबरच आता नवीन पिढीतील स्कोडा ऑक्टाव्हियाचे उत्पादन केले जाणार आहे. नव्या स्कोडा ऑक्टिव्हिया कारची किंमत 14 लाख ते 18.50 लाख रुपयांदरम्यान राहण्याची शक्यता आहे.