आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

YAHOO, APPLE सारख्या दिग्‍गज कंपन्यांच्या सीईओंची यशासाठी झोपेला कात्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंग्रजी भाषेत एक प्रसिद्ध म्हण आहे. ती म्हणजे 'Early to Bed Early to Rise, Makes You Healthy, Wealthy and Wise.' अर्थात, 'जर तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे तर दररोज सकाळी लवकर उठण्याची सवय करा'
नुकतेच एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात जगभरातील बड्या कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारींच्या (सीईओ) सवयींबाबत अभ्यास करण्‍यात आला. बहुतेक दिग्गज कंपन्यांचे सीईओ सकाळी लवकर उठत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, त्यांची दिनचर्या सकाळी लवकर उठण्यापासूनच सुरु होते.
मात्र, मॅड्रिड यूनिव्हर्सिटीमधील संशोधकांनी याउलट अभ्यास केला. त्यात असे आढळून आले, की रात्री उशीरापर्यंत जागणारे लोक अधिक यशस्वी आणि श्रीमंत असतात. चार्ल्‍स डार्विन आणि विंस्‍टन चर्चिल यांच्यासारखे लोक रात्री उशीरापर्यंत जागरण करत होते आणि सकाळीही उशीरा उठत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
परंतु नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणात असे समोर आले, की टेक्‍नोलॉजी कंपन्यांचे बहुतेक सीईओ खूपच कमी झोप घेतात. विशेष म्हणजे ई-मेल्स चेक करणे अथवा पाठवण्‍याच्या कसरतीत ते दररोज सकाळी लवकर उठतात. अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक हेच दररोज सकाळी साडेचार वाजताच बिछाना सोडतात. तसेच 'याहू'चे सीईओ मेरिसा मेअर दिवसभरात केवळ चार ते पाच तासच झोप घेतात.
टीम कूक
अ‍ॅप्‍पल कंपनीचे सीईओ टीम कूक सकाळी साडे चार वाजता झोपेतून जागे होतात. झोपेतून उठल्या उठल्या ते ई-मेल पाठवणे सुरु करतात. त्यानंतर पाच वाजता व्यायाम करतात. उल्लेखनिय म्हणजे टीम कूक हे अशी एकमेव व्यक्ती आहे, की ते कार्यालयात सगळ्यात लवकर पोहचते आणि सगळ्यांत उशिरा कार्यालयातून निघते.
अशाच प्रकारच्या काही हस्तींबाबतच्या सवयी माहीत करून घेण्यासाठी पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करा...