आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चलनाची ढसळती पत-किती योग्य?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय चलन असणारा रुपया दिवसेंदिवस अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ढसळत आहे. दोन महित्यांपूर्वी रुपयाची किमत एक डॉलरच्या तुलनेत 54 रुपये होती तर 26 जून 2013 रोजी एक डॉलरसाठी 60.12 रुपये मोजावे लागत आहे. म्हणजे मागील 2 महिन्यांत रुपयाची पत 12 टक्क्यांनी घसरली आहे. याचा अर्थ असा की भारतात माल आयात (import) करणा-या व्यापा-यांना आणि कंपन्यांना जास्त पैसे मोजावे लागत आहे, तर दुसरीकडे भारताकडून निर्यात (export) करणा-यांना त्यांच्या मालाची आणि पुरवत असणा-या सेवांकरिता जास्त मोबदला रुपयामध्ये मिळत आहे. पण भारतात होणारे आयात (import) हे भारतातून होणा-या निर्यात (export) च्या तुलनेत जास्त आहे. याचा अर्थ असा की की भारताचे व्यापार घाटे ( trade deficit) जास्त आहे आणि हे आपल्या अर्थव्यवस्थेसाठी घातक आहे. रुपयातील घसरण डॉलरच्या तुलनेत 62-63 पर्यंत होऊ शकते, असे तज्ज्ञ मंडळी सांगत आहे. ही घसरण कितपत होईल ही येणारी वेळ सांगेल.


तज्ज्ञ मंडळीचे विश्लेषण कितपत खरे ?
आपल्या देशात तज्ज्ञ मंडळीची कमी नाही. हे तज्ज्ञ रोज रुपयाची पत नवीन स्तरापर्यंत घसरेल हे भाकीत करत आहेत. किंबहुना हीच मंडळी वेगवेगळी कारणे देऊन रुपयाच्या घसरणीचे समर्थन करत आहे. ही कारणे कितपत योग्य ते पाहुया. तज्ज्ञांच्या नुसार दोन प्रमुख कारणे आहेत. जे या घसरणसाठी कारणीभूत आहे. पहिले कारण असे की सध्या भारतीय अर्थ व्यवस्थेची होणारी वाढ 5-6 टक्क्यांनी होत आहे. जी मागील काही वर्षात होणा-या 8 टक्क्यांच्या तुलनेत कमी आहे आणि दुसरे कारण असे की देशाचे ‘करंट अकाउंट’ (current account deficit) 4-5 टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे म्हणून रुपयाची पत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत दिवसेंदिवस घसरत आहे, तर खरं काय ते पाहुया.


अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेने नुकतेच मागील 4-5 वर्षात मंदिचे सावट बघितले आहे आणि सध्याही तेथील परिस्थिती वाईटच आहे. जगातील जुनी आणि प्रचलित असलेली गुंतवणुक बँक (investment bank) ‘मेरिल लींच’ बुडाली आणि दुसरी मोठी बँक असणारी सिटी बँकेची स्थिती ही वाईट होती, पण सध्या सुधार होण्याच्या पथावर आहे. तेथील अनेक उद्योग मंदीच्या प्रभावामुळे बंद झाले.


अमेरिकेची आणि भारतीय अर्थव्यवस्था
अमेरिकेची अर्थव्यवस्था सध्या 1-2 टक्क्याच्या दराने वाढत आहे. जे भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत खूप कमी आहे आणि त्यांचे करंट अकाउंट घाटे, सध्या 4 टक्क्यांपर्यंत आहे, जे आपल्या अर्थ व्यवस्थेच्या समांतर आहे. अमेरिकेच्या राष्‍ट्रपती बराक ओबामाने मान्य केले आहे की, त्यांची अर्थव्यवस्था सध्या बिकट परिस्थितीत आहे आणि त्यांना योग्य ती पाऊले उचलण्याची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था जास्त वेगाने वाढत नसली, तरीही अमेरिकी अर्थव्यवस्थेच्या तुलनेत चांगली आहे. असे म्हणण्यात हरकत नाही. रुपयाची घसरण या कारणास्तव होत आहे, हे योग्य वाटत नाही, किंबहुना डॉलरची घसरण रुपयाच्या तुलनेत झाली पाहिजे, हा निष्कर्ष काढता येईल. भारतीय सरकारने ‘रघुराम राजन’यांची नियुक्ती आपल्या अर्थ खात्यात केली आहे. रघुराम राजन यांचे मागील वर्षी प्रकाशित झालेले पुस्तक ‘फॉल्ट लाइन्स : हाऊ ही डन फॅ्रक्चर्स कॅन स्टील थ्रेटन द वर्ल्ड इकॉनॉमी ’ला ‘गॉल्डमन सॅक्स ’ या मानांकित जागतिक फर्मने ‘बिझनेस बुक ऑफ द इयर’ पुरस्कार प्रदान केले आहे.


रिझर्व्ह बँकेची पाऊले सध्या अयशस्वी
भारतीय बँक व्यवस्थेची सर्वतोपरी मानल्या जाणा-या रिझर्व्ह बँकेने (r.b.i) मागील एक महिन्यात काही पाऊले उचलली आहेत पण त्यात त्यांना यश प्राप्त झाले नाही, असे दिसून येत आहे. सोन्याची आयात सध्या जास्त प्रमाणात होत आहे. जेणे करून आपले घाटे वाढत आहे आणि परकीय चलनसाठा (joreign exchange reserves) मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. सोन्याच्या आयातीमध्ये कमी आणण्याकरिता रिझर्व्ह बॅकेने सोने आयात करणा-या बँक, व्यापारी आणि कंपन्यांवर काही नवीन बंधने लावली आहेत.


सोन्याच्या आयातीकरिता नियम कडक केले आहेत, पण सोने आयात अपेक्षित तशी कमी आलेली नाही. सोन्याचे भाव जरी 33 हजारांपासून एका वर्षात 26 हजारांपर्यंत खाली आले आहे, तरीही सोन्याची मागणी कमी झालेली नाही. कारण भारतात सोन्याचे आकर्षण प्राचीन काळापासून जास्त आहे. रिझर्व्ह बँकेने मागील 2 आठवड्यांत दोनदा सरकारी बँकांमार्फत जास्त प्रमाणात डॉलरची विक्री चलन बाजारमध्ये केली आहे. त्यामुळे काही तासांसाठी तात्पुरता सहारा रुपयाला मिळतो. पण पुन्हा घसरण सुरू होते. म्हणजे सध्यातरी कायमसाठी याचे निदान रिझर्व्ह बँकेला जाणवत नाही. अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेने लवकर याची प्रमुख कारणे शोधण्याची आणि कठोर पाऊले उचलण्याची गरज आहे. जेणे करून रुपयाच्या घसरणमुळे होणारे नुकसान कमी करता येईल.