आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मला आजही पैशांविषयी बोलताना भीती वाटते. मी अनेकदा पैशांचा गुंता सोडवण्याचे प्रयत्न केले आहेत, पण कठीण जाते. माझ्या या समस्येचे मूळ बालपणात आहे. मी लहान असताना माझे पालक कधीही पैशांबाबत माझ्याशी बोलत नसत. परिणामी पैशांबाबतीत माझा आत्मविश्वास कमी होऊ लागला. एक पालक या नात्याने मी माझ्या मुलांचे आणि पैशांचे घनिष्ठ संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हीदेखील पुढील पद्धतींनी मुलांना पैशांचे महत्त्व पटवून देऊ शकता.
पहिली : घरात आर्थिक तंगी किंवा खर्च वाढले असतील तर मुलांना याविषयी सांगू नका. पैशाच्या बाबतीत मुलांना त्यांच्या वयाप्रमाणे बोला. तुम्हाला नोकरीवरून काढून टाकले असल्यास कसे सांगाल? 10 वर्षांपर्यंतच्या मुलांना सांगा की, जोपर्यंत काही चांगले काम मिळत नाही तोपर्यंत मी ब्रेक घेत आहे. 11 ते 14 वर्षांपर्यंतच्या मुलाला सांगा की, जुनी नोकरी चांगली नव्हती त्यामुळे तुम्ही कामातून ब्रेक घेत आहात. कुमारवयीन मुलांना सांगा की, आर्थिक मंदीमुळे नोकरी गेली. मी एखादी चांगली नोकरी मिळण्याची वाट पाहत आहे.
दुसरी : आयुष्यात नेहमीच चढ-उतार असतात, हे मुलांना समजावून सांगा. त्यांचे योग्य व्यवस्थापन करण्याविषयी सांगा.
तिसरी : मुलांसोबत बोलल्यामुळे तुम्ही त्यांना विचारात घेता, असे त्यांना वाटेल. ते विश्वासही ठेवतात. आर्थिक तंगीदरम्यान मुलांवर कोणताही ताण येऊ देऊ नका.
चौथी : मुलांना शाळेच्या दिवसांतच पैशांचे व्यवस्थापन करायला शिकवा. पिग्मी बँकेत पैसे गुंतवायला सांगा. मुलांना हिशेब करता येऊ लागला की, दर आठवड्याला पॉकेटमनी द्या. घरातील काम करून पैसे कमावण्यासाठी प्रोत्साहित करा. जसे की कार धुणे, डिनर टेबल सजवणे किंवा पाळीव प्राण्याला फिरायला घेऊन गेल्यास पैसे द्या. त्यांचे बँक खाते उघडा. त्यामुळे मुलांना बँकिंगचे बेसिक, बचत आणि व्याजाविषयी माहिती मिळेल. पैशांबाबतीत स्वत:चे आकलन करा. जसे की, तुम्ही खर्चीक आहात की पैशांची बचत करण्यावर विश्वास ठेवता.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.