आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटी शहरे बनताहेत नोक-यांचे केंद्र, बीपीओमुळे रोजगारात वाढ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- नोकरीच्या प्रतीक्षेत असणा-यांसाठी चांगली बातमी आहे. सर्व क्षेत्रातील कंपन्याकडून चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत नोकर भरतीसाठी सकारात्मक संकेत आहेत. कर्मचारी भरती विषयक कार्यरत टीमलीज सर्व्हिसेसच्या ताज्या अहवालानुसार छोटी शहरांतच आता जास्त नोक-या उपलब्ध असतील.


टीमलीज र्स्व्हिसेसच्या एप्रिल ते सप्टेंबर 2013 च्या रोजगारविषयक अहवालानुसार या काळातील एम्पलॉयमेंट आउटलुक इंडेक्स 4 टक्के वाढीसह 79 राहण्याची शक्यता आहे. या आधीच्या सहमाहीत (ऑक्टोबर 2012 ते मार्च 2013 ) हा निर्देशांक 75 वर होता. सर्व्हेक्षणात सहभागी कंपन्यातील रोजगाराची आवश्यकता आणि नोक-यांतील फरक या आधारे या निर्देशांकाची गणना होते. अहवालावर भाष्य करताना टीमलीज सर्व्हिसेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष संगीत लाला यांनी सांगितले, आर्थिक मंदीच्या वातावरणातही सर्व क्षेत्रातील कंपन्या रोजगारासाठी सकारत्मक संकेत देत आहेत, ही चांगली बाब आहे.एवढेच नव्हे तर या काळातील बिझनेस आउटलुकही 2 टक्क्यांनी वाढला आहे.

अहवालानुसार, एप्रिल ते सप्टेंबर 2013 या काळात श्रेणी-1 शहरातील रोजगारात एक टक्का वाढ होईल, तर श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरात नोक-या मिळण्याच्या प्रमाणात 4 टक्के वाढ होईल. संगीताच्या मते, श्रेणी-2 ची शहरे कुशल कामगारांना स्वस्तात रोजगार मिळण्याची केद्रे बनत आहेत. येथील मध्यम उद्योगांना कर्मचारी संख्या वाढवण्याची चांगली संधी मिळते आहे. होसूर, कोची, उडपी, फाल्दा आणि छिंदवाडा साख्या शहरांतून उभे राहिलेल्या ग्रामीण बीपीओ केद्रे स्वस्तात सपोर्ट स्टाफ भरतीचे केंद्रे बनली आहेत.

नोक-या आणि बिझनेस आउटलुकच्या बाबतीत आयटी आणि हेल्थकेअर क्षेत्रे आघाडीवर आहेत. रिटेल क्षेत्रातही 5 टक्के गतीने वाढत आहेत. शहरांच्या बाबतीत मुंबई, बंगलुरू आणि दिल्ली ही शहरे आघाडीवर आहेत. टीमलीडने विविध क्षेत्रातील 614 कंपन्यात हे सर्वेक्षण केले.

मार्चमध्ये 7 टक्क्यांनी वाढल्या नोक-या
ऑनलाइन रोजगारच्या बाबतीत मार्च 2013 मध्ये गतवर्षीच्या तुलनेत 7 टक्के वाढ झाली आहे. मॉन्स्टर डॉट कॉमच्या अहवालानुसार भारतीय उद्योगक्षेत्रात आत्मविश्वास वाढल्याचे संकेत यावरुन मिळतात. फेब्रुवारीच्या तुलनेत मार्चमध्ये नोक-याचे प्रमाण स्थिर राहिले. देशातील सर्व क्षेत्रात आणि सर्व शहरात नोक-यांची स्थिती चांगली असल्याचे मॉन्स्टर डॉट कॉमचे एमडी संजय मोदी यांनी सांगितले.

श्रेणी-2 शहरात रोजगार वाढ
एप्रिल ते सप्टेंबर 2013 या काळात श्रेणी-1 शहरातील रोजगारात एक टक्का वाढ होईल, तर श्रेणी-2 आणि श्रेणी-3 शहरात नोक-या मिळण्याच्या प्रमाणात 4 टक्के वाढ होईल.