आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Small Cities Job Opportunity News In Divya Marathi

छोट्या शहरांत नोकर्‍यांचे प्रमाण वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दूरसंचार कंपन्या आपल्या नेटवर्कच्या विकेंद्रीकरणावर अधिक भर देत आहेत. विश्लेषकांनुसार, द्वितीय व तृतीय श्रेणीतील शहरांत ग्राहक सेवा केंद्र उभारत आहे. यामुळे ग्रामीण भागातील दूरसंचार क्षेत्रांत नोकर्‍यांचे प्रमाण 20 टक्क्यांनी वाढणार आहे. कंपन्याच्या विस्तारवादी भूमिकेमुळे ग्रामीण भागात त्यांना सेवा विस्तारण्यासाठी चांगल्या संधी आहेत. नेटवर्कचे जाळे विस्तारल्यास त्यातून रोजगार वाढही होणे अपेक्षित आहे.

किरकोळ क्षेत्रात 9.1 टक्के
अहवालानुसार अर्थव्यवस्थेत असलेल्या कलानुसार किरकोळ क्षेत्रात किरकोळ विकासदराची अपेक्षा आहे. यामुळे या क्षेत्रातील कर्मचार्‍यांना यंदा सर्वात कमी म्हणजे 9.1 टक्के वेतनवाढ मिळेल. 2013-14 वित्तवर्षादरम्यान स्वेच्छेने नोकरी सोडणार्‍यांचे प्रमाण 13.4 टक्के राहिले. 2012-13 वित्तवर्षाच्या तुलनेत त्यात 0.8 टक्क्यांची घट झाली आहे.