नवी दिल्ली - सरकारी पेट्रोलियम वितरण कंपन्यांनी पाच किलोचे छोटे एलपीजी गॅस सिलिंडर अनुदानित दरांवर विकणे सुरू केले आहे. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, वर्षभरात अनुदानित दरांवर ५ किलोचे ३४ सिलिंडर प्रत्येकी १५५ रुपयांत घेता येतील. ते वितरकांकडे मिळतील. अनुदानित सिलिंडरसाठी ग्राहकांना दोनपैकी एक पर्याय निवडावा लागेल.
पहिल्यानुसार वर्षभरात १४.२ किलोचे १२ सिलिंडर घेता येतील. दुस-यात वर्षभरात ३४ सिलिंडर मिळतील.वर्षाच्या सुरुवातीस सिलिंडरसाठी पसंतीचा पर्याय नोंदवावा लागेल. म्हणजेच १४.२ किलोच्या सिलिंडरची पसंती नोंदवणा-यांना मध्येच पाच किलोचे सिलिंडर घेता येणार नाही.