आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान, हलका, हाताळण्‍यास सोपा डीएसएलआर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीएससीएस साधारणपणे खिशात बसतो. परंतु ऑप्टिकल व्ह्यू फाइंडर आणि चांगली लेन्स चॉइस फक्त
डीएसएलआर म्हणजे कॅननच्या ईओएस 100 डी कॅमे-यात आहे. हा जगातील सर्वात लहान, हलका आणि पातळ डीएसएलआर आहे.
लहान, हलका, पातळ -
इतर सर्व कंपन्यांच्या, इतर ब्रँड्सपेक्षा हा कॅमेरा लहान आहे. याचे वजन अर्ध्या किलोपेक्षाही कमी अर्थात 407 ग्रॅम इतकेच आहे. यामध्ये उच्च प्रतीचे सेन्सर लावण्यात आले आहे. फोटोग्राफीचा छंद असणा-यांना सुरुवातीला हाताळण्याकरिता हा अनेक प्रकारे मदत करू शकतो. या कॅमे-यात 18 एमपी एपीएस-सी सेन्सर तसेच डिजिक-5 इमेज प्रोसेसर आहे.


कॅनन 100डीची वैशिष्‍ट्ये
यात 1080 पिक्सेल आणि 30 एफपीएसवर व्हिडिओ चित्रीकरणसुद्धा करता येते. डीएसएलआरचे हे वैशिष्ट्य आहे. ऑटोफोकस करून सब्जेक्ट ट्रॅक करता येऊ शकतो. म्हणजेच एखाद्या सुंदर वस्तूसाठी अनेक देखावे आपण ब्लर करू शकतो. यासाठी केवळ आपल्याला सेटिंग बदलत जावे लागते.


स्मार्ट फोनलाही मागे टाकणारा कॅमेरा
स्मार्टफोनपेक्षा चांगल्या पिक्चर क्वालिटीसाठी कॉम्पॅक्ट कॅमे-याची गरज वाढत आहे. रेकॉर्डिंग सुरू करण्यासाठी मागील बाजूस एक रेकॉर्ड बटण देण्यात आले आहे. ते दाबताच शटर हळूहळू उघडेल आणि बंद होईल. थोडक्यात सांगायचे झाल्यास व्हिडिओ शूटिंगसाठी 100 डी हा जगातील सर्वात स्ट्रेट फॉरवर्ड कॅमेरा आहे.


कॅनन ईओएस 100 डी किंमत 48,995 रू


हाय पॉइंट
टचस्क्रीनची सुविधा जबरदस्त.
छायाचित्राचा दर्जा उत्तम.


लो पॉइंट
डिझाइन कळणे थोडे कठीण जाते.
इतर एसएलआर कॅमे-यांच्या तुलनेत बॅटरी लाइफ कमी आहे. बिल्ट- फायसुध्‍दा नाही.


फीचर
टाइप : डिजिटल, सिंगल-लेन्स
रिफ्लेक्स, एएफ/एई कॅमे-यात बिल्ट-इन
फ्लॅश
इफेक्टीव्ह पिक्सेल
18.00 मेगापिक्सेल