मुंबई - यंगिस्तानला डोळ्यांसमोर ठेवून मर्सिडीझ बेंझ इंडियाने गेल्या वर्षात ‘कॉम्पॅक्ट लक्झरी’ ही अनोखी संकल्पना राबवली. त्यातही ‘ए- क्लास ’आणि ‘बी - क्लास’ श्रेणीतल्या या छोटेखानी मोटारींच्या माध्यमातून ‘लक्झरी टुअरर’ हा प्रकार ग्राहकांना चांगलाच भावला. या संकल्पनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने कंपनीने ‘ए -क्लास’ आणि ‘बी क्लास’ मोटारींची ‘एडिशन 1’ डिझेल आवृत्तीची भेट दिली आहे. केवळ 200 मोटारीच विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत. कॉम्पॅक्ट लक्झरी प्रकारच्या वाहनांना ग्राहकांकडून मिळाल्या लक्षणीय प्रतिसाद बघून आता या दोन्ही वर्गात ‘ एडिशन वन’ बाजारात दाखल करण्यात आली असल्याचे मर्सिडीझ बेंझ इंडियाच्या विक्री विकास विभागाचे उपाध्यक्ष बोरिस फिट्झ यांनी अनावरणप्रसंगी सांगितले.
ए क्लास ‘एडिशन वन’
आरामदायी सस्पेन्शन, इको स्टार्ट / स्टॉप कार्यप्रणाली, इलेक्ट्रॉनिक
तातडीचा ब्रेक लावल्यानंतरही गाडीवरचे नियंत्रण कायम राखणारे ‘इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम’
पॅनोरॅमिक सनरूफमुळे मोटारीला स्पोर्टी लूक, रिव्हर्स कॅमेरा, मागील बाजूस मध्यभागी हँडरेस्ट, ग्लॉस ब्लॅक हबमुळे बाह्यभाग आकर्षक, 2.2 लिटरचे डिझेल इंजिन, दर लिटरमागे 19.0 किमी अंतर कापते.
बी क्लास एडिशन वन :
सात एअरबॅग्ज, अटेन्शन असिस्ट, पुढच्या बाजुला मनोरंजनासाठी खास सुविधा, रिव्हर्स कॅमेरा, मागील बाजूस मध्यभागी हँडरेस्ट, 2.2 लिटर क्षमतेचे डिझेल इंजिन, इंधन क्षमता 50 लिटर