आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किती स्मार्ट आहे तुमचा स्मार्टफोन ?

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजची तरुण पिढी सर्रासपणे स्मार्टफोनचा वापर करत आहे. तुम्ही देखील त्यापैकी एक असू शकतात, पण यातील अनेकांना हे माहीत नसेल की कोणते घटक तुमच्या फोनला स्मार्टफोन बनवतात. साधारण फोन आणि स्मार्टफोनमध्ये काय फरक आहे. चला तर मग जाणून घेऊया स्मार्टफोनविषयीची रंजक माहिती.

स्मार्टफोन म्हणजे काय ?
संवाद साधण्यासाठी तयार करण्यात आलेला वायरलेस फोनमधील आधुनिक फोन म्हणजे स्मार्टफोन. यात बोलणे किंवा ऐकण्यासोबत इतर अनेक महत्त्वाच्या सुविधा सुद्धा असतात. पूर्वी फक्त पर्सनल डिजिटल असिस्टंट किंवा संगणकाच्या मदतीनेच ई-मेल पाठवणे व स्वीकारणे, ऑफिस डॉक्युमेंट वापरणे ही कामे करता येत होती.

स्मार्टफोनची काही वैशिष्ट्ये

स्मार्टफोनची मोबाइल उद्योगक्षेत्रात खास अशी एकही व्याख्या नाही. या फोनमधील काही खास वैशिष्ट्ये याला इतर फोनच्या तुलनेत स्मार्ट बनवतात. स्मार्टफोनमध्ये प्रामुख्याने पुढील वैशिष्ट्ये असतात.

ऑपरेटिंग सिस्टिम
स्मार्टफोन प्रामुख्याने एखाद्या ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित काम करत असते. ऑपरेटिंग सिस्टिम विविध अँप्लिकेशन चालण्यास मदत करते. अँपल आयफोन आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिमवर, ब्लॅकबेरी आयओएसवर तर इतर उपकरणे गुगलच्या अँड्राइड, एचपीच्या वेबओएस आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज प्रणालीवर चालतात.

अ‍ॅप
बहुतांश मोबाइल फोनमध्ये काही प्राथमिक सॉफ्टवेअर असतात.(उदा. क्वाँटेक्ट,अँड्रेस बुक) पण स्मार्टफोनमध्ये अतिरिक्त सॉफ्टवेअर डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध असते. यामध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिस वापरता येते. वैयक्तिक वापरासाठी वेगवेगळी अँप डाउनलोड करता येतात. त्याचप्रमाणे फोटो एडिट करणे, जीपीएसच्या मदतीने एखाद्या ठिकाणची माहिती, अद्ययावत म्युझिक, व्हिडिओ सिस्टिम वापरता येते.

वेब अ‍ॅक्सेस
बहुतांश स्मार्टफोन हायस्पीड नेट अँक्सेस करू शकतात. 3 जी, 4 जी तंत्रज्ञान वापरण्यासाठी हे फोन सक्षम असतात. तसेच वायफायची देखील सुविधा उपलब्ध असते. असे असले तरी सर्वच स्मार्टफोन हे हायस्पीडने इंटरनेट चालवण्यास सक्षम नाहीत. कंपनी आणि मॉडेलनुसार इंटरनेट स्पीड अवलंबून असते.

मेसेजिंग
सर्व फोनमधून मेसेज पाठवता आणि स्वीकारता येतात, परंतु स्मार्टफोनमध्ये मेसेजच्या सोबत ई-मेल, व्हिडिओमेल सुद्धा पाठवण्याची सुविधा असते. एओएलची एआयएम, जीटॉक, वॉटस अँप, मॅसेंजर अशी इन्स्टंट मॅसेजिंग अँप स्मार्टफोनमध्ये वापरता येतात.