आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्टफोन करणार लॅपटॉप, प्रोजेक्टरचे काम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अल्पावधीतच दैनंदिन आयुष्यात मोठे स्थान मिळवलेल्या स्मार्टफोनशिवाय काम होणार नाही, अशी परिस्थिती आहे. संवाद साधण्यापलीकडे स्मार्टफोनची उपयोगिता सिद्ध झाली आहे. याच मालिकेत आता क्यू.पी. आॅप्टोइलेक्ट्रॉनिक्स हे नवे पान लिहिले जात आहे. या तंत्रज्ञानामुळे स्मार्टफोनद्वारे मोठ्या स्क्रीनचे काम करता येणे शक्य होणार आहे. या तंत्रज्ञानातून 854/480 पिक्सेल इतके दणकट रिझोल्युशन मिळू शकणार आहे.
नुकत्याच झालेल्या सीईएस-2012 मध्ये ‘लाइट पॅड’ हे अत्याधुनिक उपकरण सादर करण्यात आले. कंपनीनुसार या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्मार्टफोनद्वारे प्रोजेक्टरचे काम होणार आहे. एवढेच नव्हे तर लॅपटॉपपेक्षाही मोठ्या स्क्रीनवर यामुळे काम करणे शक्य होईल. तुम्हाला जर प्रेझेंटेशन द्यायचे असेल तर लॅपटॉप किंवा प्रोजेक्टरची गरज उरणार नाहीच. स्मार्टफोन 60 इंची स्क्रीनचे काम करू शकेल.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वापरण्यात येणारे उपकरण हे अत्यंत हलके आहे. यामुळे मोठा प्रवास करून दूरवरच्या ठिकाणी प्रेझेंटेशन देणाºयांसाठी हे उपकरण मोठे फायद्याचे ठरणार आहे. यात लावण्यात आलेल्या सुपर शॉर्ट फोकल लेंग्थ प्रोजेक्शन लेन्समुळे स्मार्टफोनवरून 60 इंचांपर्यंतच्या स्क्रीनचे प्रोजेक्शन करता येणार आहे. यातून मिळणारी पिक्चर क्वॉलिटी ही उच्च दर्जाची असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
या अभिनव उपकरणात असलेली बॅटरीही दीर्घ वेळेपर्यंत बॅक-अप देऊ शकेल. लाइट पॅड नावाच्या या उपकरणाची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर पाच ते सात तास बॅकअप देऊ शकेल. तसेच या उपकरणाचे वजनही नगण्यच आहे. कंपनी लाइटपॅडची दोन मॉडेल्स बाजारात उतरवणार आहे. जी-1 नावाचे पहिले व्हर्जन याचवर्षी बाजारात दाखल होणार आहे. याचे वजन 550 ग्रॅम असेल.
जी-2 नावाचे दुसरे मॉडेल 2013 मध्ये सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे याचे वजन फक्त 350 ग्रॅम इतकेच राहणार आहे. जी-2 मध्ये आधीच्या तुलनेत चांगले रिझोल्युशन असेल. याचे स्क्रीन रिझोल्युशन 1280/720 इतके राहील. जी-2 चा आकार ए-4 कागदाइतका असेल. हे उपकरण तुमचा स्मार्टफोन लॅपटॉपमध्ये रूपांतरित करून टाकेल. आपल्या प्रोजेक्शन स्क्रीनवर ते क्वेर्टी की पॅड बोर्डासारखी सुविधा देईल.
सात तासांपर्यंत बॅकअप
या अभिनव उपकरणात असलेली बॅटरीही दीर्घ वेळेपर्यंत बॅकअप देऊ शकेल. लाइट पॅड नावाच्या या उपकरणाची बॅटरी एकदा चार्ज केल्यानंतर पाच ते सात तास बॅकअप देऊ शकेल. तसेच या उपकरणाचे वजनही नगण्यच आहे. कंपनी लाइटपॅडची दोन मॉडेल्स बाजारात उतरवणार आहे.